ताज्या बातम्या

Mamta Kulkarni On Dawood : दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही,ममता कुलकर्णीचं वक्तव्य

अभिनयाला रामराम करून साध्वी बनलेली ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मात्र, यावेळी तिने केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान

  • दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही,ममता कुलकर्णीचं वक्तव्य

  • दाऊदला चुकीच्या पद्धतीने चित्र निर्माण केले

अभिनयाला रामराम करून साध्वी बनलेली ममता कुलकर्णी (Mamta Kulkarni) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मात्र, यावेळी तिने केलेल्या विधानामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. ममता कुलकर्णीने दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) दहशतवादी नसल्याचे वादग्रस्त विधान केले आहे. गोरखपूरमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ममता कुलकर्णीने हे विधान केले आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना पुढे ममता कुलकर्णी म्हणाल्या की, दाऊद इब्राहिम दहशतवादी नव्हता आणि त्याने बॉम्बस्फोट घडवले नाहीत. तो दहशतवादी नसून, त्याने कधीही मुंबईत बॉम्बस्फोट घडवले नाहीत. आपण कधीही दाऊदला भेटलेलो नसल्याचेही यावेळी ममता कुलकर्णी यांनी स्पष्ट केले.

दाऊदला चुकीच्या पद्धतीने चित्र निर्माण केले

बॉम्बस्फोटांसारख्या कोणत्याही कटात दाऊदचे नाव कधीही सामील झालेले नाही. मात्र, मीडिया आणि काही राजकीय शक्ती गेल्या अनेक वर्षांपासून दाऊदला नकारात्मक पद्धतीने चित्रित करत आहेत. ममता कुलकर्णीचे हे विधान अशा वेळी आले आहे जेव्हा दाऊद इब्राहिमला १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड म्हणून अधिकृतपणे नाव देण्यात आले आहे आणि तो भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांच्या यादीत आहे. तिच्या विधानानंतर, अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. काही जण याला “न्यायालयीन प्रक्रियेचा अपमान” म्हणत आहेत, तर काही जण याला ममता कुलकर्णी यांचा प्रसिद्धी स्टंट म्हणत आहेत.

महाकुंभात घेतली साध्वीची दीक्षा

नुकत्याच पार पडलेल्या प्रयागराज येथील महाकुंभात किन्नर आखाड्यात महामंडलेश्वर म्हणून नियुक्ती झाली त्याची जोरदार चर्चा झाली. त्यानंतर त्यांनी या पदाचा राजीनामा दिला. परंतु, अवघ्या दोन दिवसांनी पुन्हा ममताला महामंडलेश्वर म्हणून नियुक्त करण्यात आले. साध्वी बनल्यानंतर ममता कुलकर्णीचे नाव आता यमाई ममता नंद गिरी असे झाले आहे. Mamta Kulkarni Controversial Statement On Dawood Ibrahim He Is Not Terrorist

बॉलिवूड सोडल्यानंतर दुबईत स्थलांतर

बॉलीवूड सोडल्यानंतर जावळपास 25 वर्षे ममता दुबईमध्ये राहत होती. गेल्या वर्षीच्या अखेरीस ती भारतात परतली. त्यानंतर तिने निवृत्तीची घोषणा करत प्रयागराज महाकुंभादरम्यान किन्नर आखाड्यातून दीक्षा घेतली आणि ती संन्यासी बनली. तिचे पिंडदान आणि पट्टाभिषेक महामंडलेश्वर डॉ. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी केले. तिला महामंडलेश्वर पद देण्यात आले.

ममता कुलकर्णीची चित्रपट कारकीर्द

ममता कुलकर्णीने 1991 मध्ये प्रदर्शित झालेल्या तमिळ चित्रपट ‘नानबरगल’ द्वारे तिच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर तिने 1992 मध्ये ‘मेरा दिल तेरे लिए’ या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये प्रवेश केला. तथापि, 1995 मध्ये प्रदर्शित झालेल्या शाहरुख खान आणि सलमान खान अभिनीत ‘करण अर्जुन’ या चित्रपटाने तिला खरी ओळख मिळाली. त्यानंतर तिने अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले. नंतर, तिचे नाव ड्रग्ज प्रकरणात समोर आले आणि त्यानंतर तिने बॉलिवूडमधून माघार घेतली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा