लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) गटाकडून भिवंडी लोकसभेसाठी बाळ्यामामा म्हात्रे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलीय. परंतु, याच मतदारसंघात काँग्रेस नेते दयानंग चोरघे उमेदवारीसाठी इच्छूक होते. त्यामुळे आता चोरघे यांनी बंडाचा झेंडा फडकवण्याचा निर्णय घेतला आहे. म्हात्रें विरोधात आता दयानंद चोरघे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
माध्यमांशी बोलताना दयानंग चोरघे म्हणाले, राज्यातील इतर जागांसह भिवंडी लोकसभा मतदारसंघातून मैत्रीपूर्ण लढत असेल, तर वरिष्ठांच्या आदेशानुसार मैत्रीपूर्ण लढत देणार किंवा कार्यकर्त्यांचा आग्रह असेल तर भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढेल.
संपूर्ण कोकण प्रांतातून काँग्रेस पक्षाला उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे परंपरागत असलेल्या कोकण प्रांत व भिवंडी लोकसभेतून काँग्रेसची निशाणी हद्दपार होईल त्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठांनी या बाबीचा विचार करून राज्यात सांगलीच्या जागेबाबत मैत्री पूर्ण लढत देण्याचा विचार होत आहे. त्याचप्रमाणे भिवंडी लोकसभा मतदार संघातूनही मैत्रीपूर्ण लढत देण्याचे आदेश वरिष्ठांनी दिले, तर मैत्रीपूर्ण किंवा कार्यकर्त्यांच्या आग्रहासाठी अपक्ष उमेदवारी लढू, अशी प्रतिक्रिया चोरघे यांनी दिली आहे.