बारामतीकडे जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची बातमी समोर येताच राज्यभरात शोकाची भावना पसरली. या घटनेची माहिती मिळताच मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नातीचा भावनिक व्हिडिओ समोर आला असून अनेकांचे डोळे पाणावले.
टीव्ही पाहत असताना अजित पवार आपल्यात नाहीत, असे आईकडून कळताच ती लहान मुलगी रडू लागते. हा क्षण सर्वांनाच हेलावून गेला. याचसोबत एका कार्यक्रमातील अजित पवार आणि त्या मुलीचा जुना व्हिडिओही व्हायरल होत आहे.
दरम्यान, सकाळच्या सुमारास मुंबईहून निघालेले विमान बारामतीजवळ उतरताना अडचणीत सापडल्याचे सांगितले जात आहे. दाट धुके, तांत्रिक अडथळे आणि लहान धावपट्टीमुळे लँडिंग कठीण झाले. अखेर विमान शेतात कोसळून स्फोट झाल्याची माहिती आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये तीव्र भावना उमटत आहेत.
थोडक्यात
बारामतीकडे जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात झाल्याची बातमी समोर आली.
राज्यभरात शोकाची भावना पसरली.
घटनेची माहिती मिळताच मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नातीचा भावनिक व्हिडिओ समोर आला.
या व्हिडिओमुळे अनेकांचे डोळे पाणावले आणि नागरिक भावूक झाले.