देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांची गुरुवारी अचानक प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना तातडीने दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनी वयाच्या 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या जाण्यानं राजकीयवर्तुळात कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे. जागतिक दर्जाचा अर्थतज्ञ तसेच एक सरळ साधे व्यक्तीमत्त्व आपण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या रुपाने गमावल्याची प्रतिक्रिया अनेक दिग्गजांनी दिली आहे. याचपार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून त्यांना ट्वीट करत श्रद्धांजली वाहली गेली आहे.
त्यांच्या जाण्यानं राजकीयवर्तुळात कधीही न भरणारी पोकळी निर्माण झाली आहे. जागतिक दर्जाचा अर्थतज्ञ तसेच एक सरळ साधे व्यक्तीमत्त्व आपण माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या रुपाने गमावल्याची प्रतिक्रिया अनेक दिग्गजांनी दिली आहे. याचपार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून त्यांना ट्वीट करत श्रद्धांजली वाहली गेली आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ट्विट
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ट्विट करत म्हणाले की, 'देशाचे माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंह यांच्या निधनाची बातमी अतीव दु:खदायक आहे. आधी केंद्रीय वित्तमंत्री आणि नंतर पंतप्रधान असताना देशाच्या आर्थिक विकासाला वेग देणारी दमदार पाऊले उचलून देशाच्या अर्थव्यवस्थेचे नवे दालन खुले करणारा क्रांतिकारक निर्णय घेणारा द्रष्टा नेता अशी त्यांची ओळख इतिहासात कायम राहील. अत्यंत साध्या, सरळ आणि शांत स्वभावाचे डॉ.मनमोहन सिंह हे एक नामवंत अर्थतज्ञ म्हणून जागतिक स्तरावर ओळखले जात होते. त्यांच्या निधनाने एक धोरणी आणि हुशार असे अर्थतज्ज्ञ, राजकीय नेतृत्व हरपले आहे. त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याकरता बळ मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. भावपूर्ण श्रद्धांजली.'