Appasaheb Dharmadhikari
Appasaheb Dharmadhikari Team Lokshahi
ताज्या बातम्या

उष्माघातामुळे श्रीसेवकांच्या मृत्यू, आप्पासाहेब धर्माधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, माझे हे दु:ख...

Published by : Sagar Pradhan

नवी मुंबईमध्ये काल महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा पार पडला. ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना हा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार त्यांना देण्यात आला. यावेळी सोहळ्यासाठी लाखो श्री सदस्य सहभागी झाले होते. परंतु, या सोहळ्यात उष्माघात झाल्याने तब्बल 11 जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या प्रकरणावरून विरोधक चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. आरोप-प्रत्यारोप सुरू असताना आता ज्येष्ठ निरुपणकार आणि पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी यावर एका पत्रकामधून प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले आप्पासाहेब धर्माधिकारी?

काल घडलेल्या घटनेवर बोलताना आप्पासाहेब धर्माधिकारी म्हणाले, महाराष्ट्र शासानाने आयोजित केलेल्या 'महाराष्ट्रभूषण' पुरस्कार सोहळ्यासाठी खारघर येथे आलेल सारे श्री सदस्य हे माझ्या कुंटुबाचे सदस्य आहेत. श्री सदस्यांचा हा परिवार देशविदेशात पसरला आहे. या पुरस्कार सोहळ्यावेळी उष्माघाताने काही श्री सदस्यांना त्रास झाला आणि त्यातील काहींचा दुर्दैवाने मृत्यू झाला. ही घटना माझ्यासाठी अत्यंत क्लेषदायक आहे. अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

पुढे पत्रात ते म्हणाले , माझ्या कुटुंबातीलच सदस्यांवर कोसळलेली ही आपत्ती आहे. आपल्याच कुटुंबातील लोकांवर घाला येण्याच्या या घटनेने मी व्यथित आहे. माझे हे दु:ख शब्दात व्यक्त करण्यापलिकडचे आहे. मृत्यू झालेल्या या सदस्यांच्या कुटूंबियांची आणि माझी वेदना सारखीच आहे. श्री सदस्य परिवाराची एकमेकांच्या सोबत राहण्याची पिढ्यानपिढ्यांची पंरपरा आहे त्यानुसार आम्ही सारेजण या आपदग्रस्तांसोबत कायम आहोत. यातील मृतांना सद्रती लाभी, तसेच त्यांच्या कुटूंबाला हा आघात सहन करण्याची शक्‍ती मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. झाला प्रकार दुर्देवीच होता. त्याचे कोणत्याही पद्धतीने राजकारण होऊ नये, अशी आमची अपेक्षा आहे. असे आवाहन त्यांनी पत्रातून केले आहे.

IPL 2024 : हैदराबाद आणि गुजरातचा सामना रद्द; काय आहे प्ले ऑफचं समीकरण? 'हा' संघ मारणार बाजी

"छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं असेल, तर..."; अमोल कोल्हेंनी भाजपवर डागली तोफ

देश तोडण्याची भूमिका घेणाऱ्या काँग्रेसला अमित शहांचं चोख प्रत्युत्तर, म्हणाले; "भारताचं विभाजन..."

Jayant Patil : भुजबळ साहेब नाराज हे आम्ही ऐकून आहे

Summers: उन्हातून घरी आल्यावर चुकूनही करू नका 'या' गोष्टी...