ताज्या बातम्या

Mumbai Hostage Scare : मुलांना डांबून ठेवणाऱ्या माथेफिर्‍याचा मृत्यू

पॉवईत गुरुवारी दुपारी घडलेलं बंधक नाट्य तब्बल 35 मिनिटांच्या थरारक कारवाईनंतर संपलं. आरए स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस धरून बसलेल्या रोहित आर्याला पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्स टीमने (QRT) ठार केलं.

Published by : Riddhi Vanne

मुंबई : पॉवईत गुरुवारी दुपारी घडलेलं बंधक नाट्य तब्बल 35 मिनिटांच्या थरारक कारवाईनंतर संपलं. आरए स्टुडिओमध्ये 17 मुलांना ओलीस धरून बसलेल्या रोहित आर्याला पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्स टीमने (QRT) ठार केलं, तर सर्व मुलांची सुरक्षित सुटका करण्यात आली. ही घटना महावीर क्लासिक इमारतीतील आरए स्टुडिओत घडली. दुपारी सुमारे1.45 वाजता पोलिसांना कॉल आला की एका व्यक्तीने काही मुलांना ओलीस बनवलं आहे. माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि विशेष पथक घटनास्थळी दाखल झाले.

पोलीस उपायुक्त दत्ता नलवाडे यांनी सांगितलं की, आरोपी रोहित आर्याकडे एअरगन आणि काही रासायनिक पदार्थ होते. प्राथमिक प्रयत्नात पोलिसांनी त्याच्याशी चर्चेद्वारे परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. आर्याने कमांडोवर गोळीबार केला, त्यामुळे पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल कारवाई केली. “ही कारवाई अत्यंत आव्हानात्मक होती,” असे नलवाडे यांनी सांगितले. “आमचं प्राधान्य मुलांचे जीव वाचवणे होते. चर्चेत कोणतीही प्रगती होत नसल्याने आमच्या QRT टीममधील आठ कमांडोनी बाथरूममार्गे स्टुडिओमध्ये प्रवेश करून आरोपीला काबूत घेतलं. त्यावेळी झालेल्या गोळीबारात आरोपी ठार झाला.”

पत्रकार मुनीश पांडे यांनी सांगितलं की, या घटनेचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. “हीच ती अब्जावधी रुपयांची गोष्ट त्याने हे का केलं, हे अजूनही समजलेलं नाही,” असं त्यांनी नमूद केलं. घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झालं होतं, पण सर्व मुलं सुखरूप बाहेर आल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास सुरू केला असून, आरोपीच्या पार्श्वभूमीचा आणि मानसिक स्थितीचा तपास केला जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा