ताज्या बातम्या

जखमी गोविंदा प्रथमेश सावंतचा मृत्यू

दहींहंडीचे थर लावताना जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या 22 वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू झाला आहे.

Published by : Siddhi Naringrekar

दहींहंडीचे थर लावताना जखमी झालेल्या प्रथमेश सावंत या 22 वर्षांच्या गोविंदाचा मृत्यू झाला आहे. प्रथमेश सावंत याचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. करी रोड येथील साईभक्त क्रिडा मंडळातील जखमी गोविंदाचा गेल्या दीड महिन्याहून अधिक काळापासून संघर्ष सुरू होता. मात्र आज शनिवारी त्याची प्राणज्योत मावळली.

प्रथमेश सावंतवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते. दहीहंडी पथकातील वरच्या थरातील गोविंदा अंगावर पडल्याने प्रथमेश गंभीर जखमी झाला होता. त्याच्या पाचव्या मणक्याला गंभीर दुखापत झाली होती.

प्रथमेश हा चुलत्यांकडे वास्तव्यास राहत होता. प्रथमेशचे आई-वडील काही वर्षांपूर्वीच वारले होते. तो शिक्षण घेता घेता डिलिव्हरी बॉयचे देखिल काम करत होता.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टिका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ

Pune : पुण्यातील कोथरूड गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक