ताज्या बातम्या

Mukesh Ambani Threat: मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी, यावेळी केली 200 कोटींची मागणी

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने मुकेश अंबानी यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली आहे.

Published by : shweta walge

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी धमकीच्या ईमेलचे उत्तर न दिल्याने अनोळखी आरोपीकडून आणखी एक धमकीचा ईमेल यावेळी आरोपीने 200 कोटी रुपयांची मागणी केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दुसऱ्या ईमेलमध्ये आरोपीने "आपण माझा ईमेलला प्रतिसाद दिला नाही. आता रक्कम 200 कोटी आहे अन्यथा मृत्यू वॉरंटवर स्वाक्षरी केलेली आहे" असा मजकूर ईमेलमध्ये लिहण्यात आला आहे.

शुक्रवारीच अंबानी यांना जीवे मारण्याच्या धमकीचा ईमेल आला होता. ज्यामध्ये आरोपीने अंबानी यांच्याकडे 20 कोटी रुपयांची मागणी केली होती आणि जर पैसे दिले नाहीत तर आपला जीव मारण्याची धमकी दिली होती.

पहिल्या धमकीच्या ईमेलमध्ये “तुम्ही 20 कोटी रुपये दिले नाहीत, तर जिवे मारण्याची धमकी दिली होती, त्यात जीवे मारण्यासाठी आमच्याकडे चांगले शूटर असल्याचाही आरोपीने दावा केला होता. तो धमकीचा ईमेल मिळाल्यानंतर, मुकेश अंबानी यांच्या सुरक्षा प्रभारींच्या तक्रारीच्या आधारे, गावदेवी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 387 आणि 506 (2) अंतर्गत अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर नोंदवून तपास सुरू केला आहे.

मात्र आरोपीने आणखी एक धमकीचा ईमेल आरोपीने केल्याने पोलिसाकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा