Vasant More Google
ताज्या बातम्या

Vasant More: वसंत मोरे यांना जीवे मारण्याची धमकी, मनसे कार्यकर्त्यानं दिली धमकी? ऑडिओ क्लीप व्हायरल

शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. खुद्द वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली असून एक ऑडिओ क्लीप शेअर केली आहे.

Published by : Naresh Shende

Vasant More Death Threat: शिवसेना ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. खुद्द वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर याबाबत माहिती दिली असून एक ऑडिओ क्लीप शेअर केली आहे. एका अज्ञात व्यक्तीनं फोनच्या माध्यमातून मोरे यांचा भाचा प्रतिक कोडितकरशी संपर्क साधला. यावेळी त्या व्यक्तीनं मोरे यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं समोर आलं आहे.

याबाबत वसंत मोरे यांनी ट्वीटरवर पोस्ट शेअर करत म्हटलंय, "मी जर पुन्हा माझ्या जुन्या पक्षात गेलो तर असा काय गुन्हा केलाय की अगदी मनसे वाले माझी मर्डर करण्यापर्यंत गेले...? संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यासाठी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन येथे मागणी केली आहे. पाहू पोलीस आता यावर काय भूमिका घेतात?"

"वसंत मोरे यांचा या महिन्यात विकेट टाकणार म्हणजे टाकणार. १०० टक्के विकेट टाकणार. या महिन्याच्या शेवटी विकेट टाकणार. माझ्या नावाने पोलीस तक्रार कर. आधीच १३-१४ आहेत. अजून एक होईल. परत वर्षभर जेलमध्ये जाईल आणि पुन्हा बाहेर येईल. मी मनसेचा कार्यकर्ता आहे", असं संभाषण या ऑडिओ क्लीपच्या माध्यमातून समोर आलं आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा