ताज्या बातम्या

Ranveer Allahbadia: "पळून गेलो नाही, जीवे मारण्याची धमकी" रणवीर अलाहबादियाची खळबळजनक पोस्ट

प्रसिद्ध युट्यूबर रणवीर अलाहबादिया वादाच्या भोवऱ्यात; जीवे मारण्याच्या धमक्यांनंतर पळून गेल्याच्या अफवांना उत्तर.

Published by : Prachi Nate

प्रसिद्ध युट्यूबर समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लॅटेंट' शो दरम्यान रणवीर अलाहबादिया वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. त्याने शोमध्ये केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्याच्यावर राजकीय तसेच मनोरंजन क्षेत्रातून टीका करण्यात आल्या. नुकतीच रणवीर अलाहाबादियाबद्दल एक महत्त्वाची बातमी समोर आली. गुरुवारी संध्याकाळी मुंबई पोलिस चौकशी दरम्यान रणवीरच्या घरी गेले असता त्याच्या घराला कुलूप दिसले. त्याचा फोन देखील बंद असल्याची माहिती मिळाली आणि त्यामुळे तो घरातून बेपत्ता झाल्याचे सांगण्यात आलं होत.

असं असताना रणवीर अलाहबादिया बाबत एक नवीन अपडेट समोर आली आहे. यादरम्यान रणवीर अलाहबादियाने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली आहे ज्यात त्याने तो पळून जात नसल्याचं स्पष्ट केले आहे. त्याचसोबत त्याने त्याला मिळत असलेल्या धमक्यांबद्दल देखील सांगितले आहे. त्याला जीवे मारण्याच्या आणि त्याच्या कुटुंबाला हानी पोहोचवण्याच्या धमक्या येत आहेत, याबद्दल देखील तो बोलला आहे.

रणवीर अलाहबादिया पोस्टमधून नेमकं काय म्हणाला?

माझी टीम आणि मी पोलीस आणि इतर सर्व प्राधिकरणांना सहकार्य करत आहोत. मी योग्य प्रक्रियेचे पालन करीन आणि सर्व एजन्सींसाठी उपलब्ध असेल. पालकांबद्दलची माझी टिप्पणी असंवेदनशील आणि अनादर करणारी होती. पोलीस आणि इतर सर्व प्राधिकरणांना सहकार्य करणे ही माझी नैतिक जबाबदारी आहे आणि मी अधिक चांगले करणे मी मनापासून दिलगीर आहे. मला मारून माझ्या कुटुंबाला दुखवायचे आहे असे म्हणत लोकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येताना मी पाहत आहे. लोकांनी माझ्या आईच्या दवाखान्यात रुग्ण म्हणून आक्रमण केले आहे. मला भीती वाटते आहे आणि मला काय करावे हे समजत नाही. पण मी पळून जात नाही. माझा भारतातील पोलीस आणि न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे.

नेमकं प्रकरण काय?

प्रसिद्ध युट्यूबर समय रैनाचा शो 'इंडियाज गॉट लॅटेंट' पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडला. नुकताच त्याचा नवीन एपिसोड समोर आला आहे. यामध्ये युट्यूबर आशिष चंचलानी, जसप्रीत सिंह व रणवीर अलाहबादिया यांनी हजेरी लावली होती. यावेळी राणवीर अलाहबादिया याने केलेल्या वक्तव्यामुळे तो चांगलाच चर्चेत आला आहे. या कार्यक्रमामध्ये रणवीरने आई-वडिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले आहे. त्यामुळे अनेकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत. सोशल मीडियावर रणवीरला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. याप्रकरणी रणवीर अलाहाबादिया, अपूर्वा मखिजा, समय रैना आणि 'इंडिया गॉट लेटेंट'च्या आयोजकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : काल एक गद्दार काल बोलला 'जय गुजरात' - उद्धव ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "मराठी शिकणारे शिक्षणमंत्री इंग्रजीमध्ये शिकणारे मुख्यमंत्री..." राज ठाकरेंचा नाव न घेता टोला

Raj Thackeray Live : 'जे बाळासाहेबांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलंय'; राज ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना टोला

Raj-Uddhav Thackeray Family Member Vijayi Melava : सहकुटुंब सहपरिवार..; ठाकरे बंधूंचे कुटुंब एकाच व्यासपीठावर