पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवती महिलेच्या उपचारासाठी दहा लाखांची मागणी केली. महिलेचे कुटुंब हातात असलेले अडीच लाख भरायला तयार असून देखील महिलेला रुग्णालयात दाखल करून घेतलं नाही. शेवटी त्या महिलेला इतर रुग्णालयात हलवत असताना त्या महिलेला त्रास झाला.
जुळ्या मुलांना जन्म देऊन आईचा मृत्यू झाला. तनिषा सुशांत भिसे असे जीव गेलेल्या महिलेचे नाव आहे. दरम्यान आता या प्रकाराने संतापाची लाट उसळली असून प्रशासनाच्या हलगर्जीपणाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
आता याच पार्श्वभूमीवर आता दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने मोठा निर्णय घेतला असून ‘यापुढे कोणत्याही रुग्णालकडून अनामत रक्कम ( डिपॉझिट) घेतली जाणार नाही’. तो रुग्ण इमर्जन्सी रूममध्ये आलेला असो किंवा डिलिव्हरीच्या विभागात आलेला असो. लहान मुलांच्या विभागात आलेला असो, त्यांच्याकडून इमर्जन्सीमध्ये डिपॉझिट रक्कम घेतली जाणार नाहीये. असा ठराव दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या विश्वस्त बैठकीत झाला असल्याची माहिती मिळत आहे.