Deepak Kesarkar On Ajit Pawar : दीपक केसरकर अनेक वेळा साईंच्या दर्शनाला हजेरी लावतात. आज सकाळी केसरकर यांनी साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी दर्शन घेऊन झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला.
यावेळी दीपक केसरकर यांनी अजित पवार यांना खुली ऑफर दिली आहे. केसरकर म्हणाले की, दादा हे कार्यक्षम नेते आहेत. त्यांच्या कामाचा फायदा हा राज्यातील जनतेला झाला पाहिजे. राष्ट्रवादीमध्ये त्यांच्यासोबत काय होतंय हे सर्वांना माहित आहे.
दादा विरोधी पक्षाचे नेते, जबाबदार नेते आहेत. सामाजिक ऐक्य राखण्यामध्ये दादा आमच्याबरोबर आघाडीवर असतील याची मला खात्री आहे. संजय राऊत यांच्यासारखे लोक रोज बोलतात त्यांच्या बोलण्याकडे कोणी लक्ष देत नाही. मात्र दादा जेव्हा बोलतात ते जनता त्याला गांभीर्याने घेते. अजित पवार कार्यक्षम नेते असून त्यांनी आमच्यासोबत यावं. अशी खुली ऑफर केसरकर यांनी अजित पवार यांना दिली.