बीड जिल्ह्यासह संपूर्ण राज्यात मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणावर राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. याच पार्श्वभूमीवर दिपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
दिपक केसरकर म्हणाले की, कुठलाही ज्यावेळी पोलीस तपास असतो. त्यावेळेला तो निपक्षपातीपणे झाला पाहिजे आणि त्याच्यामुळे कुठलाही आरोप जर धनंजय मुंडेंवर सिद्ध झाला नसेल तर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याचे कोणतेच प्रयोजन नाही. कुठल्याही गोष्टीमध्ये शेवटी राजकारण येते. आतापर्यंत जी आरोपींची नावे जाहीर झालेली आहेत. त्याच्यापैकी काही लोक फरार आहेत. अगोदर त्यांना अटक करावी लागले. त्यानंतर निपक्षपाती चौकशी होईल.
यासोबतच ते पुढे म्हणाले की, आरोपी हा आरोपी असतो. तो कोणाचा मित्र आहे, कोणाचा नातलग आहे या गोष्टीला फारसं महत्व नसते. शेवटी आरोपीचे नाव एकदा पोलिसांनी जाहीर केलं की त्याला अटक करणारच. यंत्रणा जिल्ह्यापुरती मर्यादित नसते राज्याची यंत्रणा आहे. जेव्हा राज्याचे गृहमंत्री जाहीर करतात त्यावेळी लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. असे दिपक केसरकर म्हणाले.