मुंबईतल्या गजबजलेल्या पवई परिसरामध्ये रोहित आर्या नावाच्या व्यक्तीनं आपल्या प्रलंबित मागण्या महाराष्ट्र शासनाकडून पूर्ण होत नसल्याच्या कारणावरून काही मुलांना ओलीस धरण्याचा थरारक घटनाक्रम सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. पोसील चकमकीत रोहित आर्यचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दरम्यान तत्कालिन शिक्षण मंत्री दीपक केसरकरांच्या ट्विटर हँडलवर एन्काउंटर रोहित आर्यचे फोटो व्हायरल झाले आहेत.
त्यावेळी बाजूला तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उदय सामंत हे देखील उपस्थित होते. रोहित आर्यने शिक्षण विभागासाठी एक उपक्रम राबवल्याचे समोर आले आहे. यावर प्रतिक्रिया देत दिपक केसरकर म्हणाले की, "रोहित आर्याने चांगले काम केले होते. त्यांचे कार्यक्रम चांगले होते. त्यामुळे त्यांचं कौतुक आहेच. मात्र मुलांना ओलीस धरण चुकीचं आहे. असं घडता कामा नये. सुदैवाने पोलिसांनी मुलांची सुटका केली पण चकमकीत रोहीत आर्या यांचा मृत्यू झाला याच मनात अतिशय दुःख आहे. माझ्या दृष्ठिने मुलांचा जीव महत्वाचा आहे. त्यांचं बिल का बाकी होत याबाबत शिक्षण विभागाने खुलासा केलाय. त्याने थेट वेबसाईट काढून मुलांकडून पैसे घेतले होते ते पैसे परत करण्याची अट घालण्यात आली होती. त्याच पालन झाला नाही त्यामुळे बिल बाकी राहील "
तसेच रोहित आर्यचा एन्काऊंटर बनावट असल्याचा आरोप नितीन सातपुते यांनी केला आहे. त्यावर माजी मंत्री दीपक केसरकर यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, "मूल त्यांच्या ताब्यात होती. मुलांना काही झालं असतं तर ते योग्य ठरलं नसत. रोहित आर्याची बिल पेंडिंग होती त्यांच्याशी त्यांची गाठ घालून द्या असे मी पोलिसांना सांगितले होते. त्याचा दुर्दैवी निधन होणे हेच माझ्यादृष्टीने अतिशय दुःखदायक आहे. त्याची जी बिल बाकी आहेत ती त्याच्या कुटुंबाला मिळवीत म्हणून मी प्रयत्न करेन. जर माझ्या सोबत बोलायला दिलं असतं आणि त्याचं समाधान झालं नसत आणि त्याने मुलांना काही तरी केल असत तर मी स्वतःला कधी माप करू शकलो नसतो".