दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी आज मतदान पार पडणार आहे. सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात होणार आहे. दिल्ली विधानसभेसाठी 699 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत.
दिल्लीतल्या 70 विधानसभा क्षेत्रांमध्ये 13,766 मतदान केंद्रांवर मतदान होणार असून मतदानाची सगळी तयारी पूर्ण झाली असून मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. आज मतदान होणार असून 8 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
आम आदमी पक्ष, भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस असा तिरंगी सामना होणार आहे. या निवडणुकीत आता कोणा बाजी मारणार हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.