ताज्या बातम्या

DC vs CSK IPL 2025 : दिल्लीचा चैन्नईवर २५ धावांनी विजय

विजयी खेळीसह दिल्लीला सलग तिसरा सामना जिंकण्याचा मान मिळाला आहे. तर चैन्नईने पराजयाची हॅट्ट्रीक केली आहे.

Published by : Rashmi Mane

दिल्ली कॅपिटल्स आणि चैन्नई सुपर किंग्जच्या आयपीएल सामन्यात दिल्लीने चैन्नईवर २५ धावांनी विजय मिळवला. लोकेश राहुलच्या अर्धशतकी खेळीमुळे दिल्ली संघाला प्रथम फलंदाजी करताना १८३ धावा करता आल्या. या धावांचा पाठलाग करताना मात्र चैन्नईचा संघ १५८ धावांपर्यंतच मजल मारू शकला. या विजयी खेळीसह दिल्लीला सलग तिसरा सामना जिंकण्याचा मान मिळाला आहे. तर चैन्नईने पराजयाची हॅट्ट्रीक केली आहे.

महेंद्रसिंग धोनीला संघाला विजय मिळवून देण्याची ही चांगली संधी होती. पंरतू धोनीने यावेळी संथगतीने खेळत संघाच्या पराभवात भर पाडली. तर दुसरीकडे विजय शंकरमुळे खेळपट्टीवर सेट होऊनही मोठी खेळी साकारली नाही. त्यामुळे दिल्लीने या सामन्यात चेन्नईवर २५ धावांनी विजय मिळवला. दिल्लीच्या १८४ धावांचा पाठलाग करण्यासाठी चेन्नईचा संघ मैदानात उतरला. पण त्यांना सुरुवातीपासूनच एकामागून एक धक्के बसायला लागले. त्यामुळे त्यांची २ बाद २० अशी अवस्था झाली होती. विजय शंकरने संघाला सावरले, परंतू शिवम दुबे आणि रवींद्र जडेजा हे लवकर बाद झाल्यामुळे चेन्नईची ५ बाद ७४ अशी अवस्था झाली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा