ISIS Suspects Arrested  
ताज्या बातम्या

ISIS Suspects Arrested : दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई; 9 संशयित इसिस दहशतवादी ताब्यात

दिल्ली पोलिसांची 12 ठिकाणी कारवाई

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

9 संशयित इसिस दहशतवादी ताब्यात

दिल्ली पोलिसांची 12 ठिकाणी कारवाई

(ISIS Suspects Arrested) दिल्ली पोलिसांनी दहशतवादविरोधी मोहीम राबवत देशभरात मोठी कारवाई केली असून, आयएसआयएसशी संबंधित एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. त्यानंतर विविध राज्यांमध्ये छापेमारी करून आणखी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या संपूर्ण कारवाईत केंद्रीय तपास यंत्रणा, राज्यांचे एटीएस पथक आणि स्थानिक पोलिस दलांनीही सहकार्य केले.

मुख्य आरोपी आफताब हा मुंबईचा रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या हालचालींवर लक्ष ठेवल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने ही मोहीम सुरू केली. मुंबई, रांचीसह अनेक ठिकाणी छापे टाकून संबंधित व्यक्तींना चौकशीसाठी आणण्यात आले आहे.

याचदरम्यान, झारखंडच्या रांची शहरातून असहर दानिश नावाच्या संशयिताला अटक करण्यात आली आहे. तो बोकारो जिल्ह्यातील पेटवार गावचा असून, लोअर बाजार परिसरातील इस्लाम नगर भागातून त्याला पकडण्यात आले. तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्याकडून काही साहित्य आणि कागदपत्रे जप्त केली आहेत.

सध्या सर्व संशयितांची कसून चौकशी सुरू असून, या तपासातून आणखी काही महत्त्वाचे धागेदोरे मिळण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या कारवाईमुळे आयएसआयएसच्या हालचालींवर आळा बसणार असल्याची अपेक्षा आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा