ताज्या बातम्या

Washim Hospital: वाशिम रुग्णालयात महिला कर्मचाऱ्यांकडे शरीर सुखाची मागणी; आरोग्य विभागात नेमकं काय सुरू?

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. महिला कर्मचाऱ्यांनी आरोग्य अधिकाऱ्यावर शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे.

Published by : Team Lokshahi

थोडक्यात

  • पोलिसांकडून नकारात्मक प्रतिसाद

  • आमदार भावना गवळी यांची ठाम भूमिका

  • कठोर कारवाईची आवश्यकता

वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्याच्या ग्रामीण रुग्णालयातून धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. महिला कर्मचाऱ्यांनी आरोग्य अधिकाऱ्यावर शरीरसुखाची मागणी केल्याचा गंभीर आरोप केला आहे. याबाबत तक्रार दाखल करण्यासाठी त्या महिलांनी पोलिस ठाण्याचा दरवाजा ठोकवला. मात्र, पोलिसांनी योग्य प्रतिसाद न दिल्याने महिलांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे.

यानंतर महिला कर्मचाऱ्यांनी थेट आमदार भावना गवळी यांची भेट घेतली असून आमदार भावना गवळी यांनी या या प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच यावर त्या म्हणाल्या की, “अशा प्रकारच्या घटना खपवून घेतल्या जाणार नाहीत. संबंधित अधिकाऱ्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. महिलांनी धैर्य दाखवत आवाज उठवला आहे, त्यांना न्याय मिळालाच पाहिजे,” अशी ठाम भूमिका आमदार भावना गवळी यांनी घेतली.

या प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कडक कारवाई होण्याची मागणी महिला कर्मचाऱ्यांसह स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा