राज्यात पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वातावरण तापू लागले आहे. 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असला, तरी अवघ्या काही तासांतच या निवडणुका पुढे ढकलाव्यात अशी मागणी पुढे आली आहे.
ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे यांनी यासंदर्भात निवडणूक आयोगाला निवेदन पाठवले आहे. 5 फेब्रुवारी रोजी मतदान ठेवण्यात आले असून, याच दिवशी धनगर व बहुजन समाजाची चिंचणी मायाक्का देवीची मोठी वार्षिक यात्रा भरते. महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवर होणाऱ्या या यात्रेत राज्यभरातून लाखो भाविक कुटुंबासह सहभागी होतात.
शेंडगे यांच्या मते, या धार्मिक यात्रेमुळे अनेक मतदार गावाबाहेर असतील. त्यामुळे मतदानाच्या दिवशी मोठ्या संख्येने लोक मतदान करू शकणार नाहीत आणि मतदारसंख्या कमी राहण्याची शक्यता आहे. ही बाब लोकशाही प्रक्रियेसाठी योग्य नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोग या मागणीवर काय निर्णय घेतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
थोडक्यात
🔹 राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पुन्हा तापत चाललेल्या राजकीय वातावरणात
🔹 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समित्यांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर
🔹 निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही तासांत ढकलण्याची मागणी समोर आली
🔹 राजकारण्यांमध्ये आणि पक्षांमध्ये विवादाची परिस्थिती निर्माण
🔹 नागरिक आणि उमेदवारांसाठी निवडणुकीच्या तारखांबाबत असमाधानी वातावरण