एल्फिन्स्टन पूल 2 वर्षांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. वरळी-शिवडी कनेक्टरसाठी एल्फिन्स्टन पुलाची पुर्नबांधणी करण्यात येणार असून त्यासाठी हा पूल वाहतुकीसाठी दोन वर्षे बंद ठेवण्यात येणार आहे.
काल (25 एप्रिलपासून हा पूल बंद ठेवण्यात येणार होता मात्र आता एल्फिन्स्टन पुलाचे पाडकाम सोमवारपर्यंत स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक रहिवासी व एमएमआरडीएमध्ये सोमवारी याविषयी बैठक होणार आहे.
सोमवारच्या बैठकीत तोडगा याविषयी तोडगा काढल्यानंतर पाडकामास सुरुवात केली जाणार आहे. त्यामुळे आता याबाबत काय निर्णय होतो हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे. जुना ब्रिज तोडून त्या ठिकाणी डबल डेकर ब्रिजची निर्मिती एमएमआरडीएच्या माध्यमातून होणार आहे. एमएमआरडीएने या पुलाची पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेतला असून नवीन पूल बांधण्यासाठी दोन वर्षांचा काळ लागण्याची शक्यता आहे.