ताज्या बातम्या

Dengue cases rising : पुणेकरांनो काळजी घ्या! डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ

Published by : Shweta Chavan-Zagade

अमोल धर्माधिकारी | पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे शहरात गेल्या महिन्यापासून डेंगूच्या रुग्णांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसतेय. गेल्या काही दिवसांपासून पुण्यात डेंगू (Dengue) आणि चिकनगुनियाच्या रुग्णांचे प्रमाण वाढले आहे. गेल्या ८ दिवसात पुण्यात ४० हून अधिक डेंग्यूचे रुग्ण शहरात आढळले आहेत. गेल्या ७ महिन्यात पुण्यात जवळपास २०० हून अधिक डेंग्यूचे रुग्ण पुण्यात आढळून आले आहेत.

या आजारामध्ये ताप, डोकेदुखी, उलट्या होणे, अतिसार असे लक्षणं दिसून येतात. पावसाळा सुरू झाल्यापासून पुण्यातील औंध, बाणेर, वारजे, कर्वेनगर, कसबा पेठ, ढोले पाटील रोड या भागात डेंग्यू चे रुग्ण वाढलेले पाहायला मिळतात. पावसाचे रस्त्यावर साठलेले पाणी, तुंबलेले नाले, रस्त्यावरचा कचरा यामुळे हे रोग लवकर पसरले जात आहेत. गेल्या काही दिवसात, डेंग्यूच्या रुग्णांमध्ये पुणे राज्यात अव्वल ठरलं आहे. राज्याच्या इतर जिल्ह्यांमध्ये असणारी डेंग्यूची रुग्ण संख्या पुण्यापेक्षा कमी आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पुण्यात डेंगू, चिकनगुनिया आणि कोल्हेरा या साथीच्या आजारांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. डेंग्यू हा रक्त शोषणाऱ्या डासांच्या माध्यमातून एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीला संसर्ग होणारा आजार आहे. डेंग्यूचा विषाणू प्रामुख्याने इडिस एजिप्ती या जातीच्या डासाच्या मादीच्या माध्यमातून पसरतो.

डेंग्यू शहरात आटोक्यात आण्यासाठी पुणे महानगरपालिकेने यावर्षी कीटक प्रतिबंधक विभागाने ४७० इमारतींना डेंगी डासाची उत्पत्ती झाल्या प्रकरणी नोटीस बजावली आहे. पावसामुळे रिकाम्या जागेत पाणी साठल्या जातं आणि याच साचलेल्या पाण्यात बहुतांश वेळी डासांची उत्पत्ती होते. यामुळे घरात मोकळ्या जागेत डबक्यात, झाडांच्या कुंडीत, टाक्यांमध्ये पाणी साठवू नका असे आव्हान महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आलेले आहे. तसेच कारवाईचा इशारा ही देण्यात आला.

कशी काळजी घ्याल?

- खराब टायर्स नष्ट करा

- पाण्याची भांडी, ड्रम, रांजन व्यवस्थित झाकून ठेवा

- घरातील टाक्यांना झाकणे बसवा

- मोठ्या उबक्यात डास अळी भक्षक गप्पी मासे सोडा

- शेणखताचे ढिगारे गावापासून दुर अंतरावर टाका

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा

टी-२० वर्ल्डकपआधी कर्णधार रोहित शर्माचं फॉर्मबाबत मोठं विधानं; म्हणाला,"फलंदाज म्हणून मला..."

"मुंबई आणि महाराष्ट्राचं वैभव लुटणाऱ्यांना आम्हाला गाडायचंय"; उद्धव ठाकरेंचा PM मोदी आणि अमित शहांवर निशाणा

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...