बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(Flights ) दाट धुक्यामुळे हवाई वाहतुकीवरही परिणाम होत आहे, ज्यामुळे विलंब आणि उड्डाणे रद्द होण्याचे प्रकार घडत आहेत. दाट धुक्यामुळे विमानसेवा ठप्प झाल्याचे पाहायला मिळत आहे. दिल्लीसह उत्तर भारतात पसरलेल्या दाट धुक्यामुळे 500 विमानांना उशिर झाला, तर 14 विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले.
दिल्ली विमानतळावरून 10 विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले. प्रवाशांनी प्रवासाच्या नियोजनासंदर्भात कंपन्यांच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असे आवाहन कंपन्यांनी केले आहे. याचा सर्वाधिक फटका मात्र दिल्ली विमानतळाला बसल्याचे पाहायला मिळाले.
Summary
दाट धुक्यामुळे विमानसेवा ठप्प
तब्बल 500 विमानांना विलंब, 14 विमाने रद्द
सर्वाधिक फटका दिल्ली विमानतळाला