थोडक्यात
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना दौऱ्यावर
दुपारी साडेतीन वाजता शिवसेनेच्या मेळाव्याला सुरुवात होणार
मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश होणार
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज जालना दौऱ्यावर जाणार आहेत, दुपारी तीन वाजता एकनाथ शिंदे यांचे जालना शहरात आगमन होईल. त्यानंतर शहरातील मामा चौक येथे दुपारी साडेतीन वाजता शिवसेनेच्या मेळाव्याला सुरुवात होणार आहे, या मेळाव्यात मोठ्या प्रमाणावर पक्षप्रवेश देखील होणार आहेत. आगामी निवडणुकीत शिंदे गटाची ताकद वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. हा मेळावा झाल्यानंतर त्यानंतर सोयीनुसार एकनाथ शिंदे हे मुंबईच्या दिशेने रवाना होतील. एकनाथ शिंदे येणार आहेत परंतु, अधिकृत दौरा आणखी आला नाही.