ताज्या बातम्या

Eknath Shinde : 'हा पुर्वीचा भारत नाही, घुसके मारनेवाला भारत आहे'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा पुनरोच्चार

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज, रविवारी कल्याण-डोंबिवलीतील विविध प्रकल्प भूमीपूजन, लोकार्पण करण्यात आले.

Published by : Rashmi Mane

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज, रविवारी कल्याण-डोंबिवलीतील विविध प्रकल्प भूमीपूजन, लोकार्पण, बाधितांना सदनिका वाटप, दामिनी पथकाला 16 दुचाकी वाहनांचे हस्तांतरण, ट्रेनिंग सेंटर भूमिपूजन करण्यात आले. यावेळी त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले. कल्याण शहर ऐतिहासिक आणि सांस्कृतिक आहे. हे शहर आगळवेगळं शहर आहे. त्याच महत्व राखण्याचे काम आपण करावे, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

दरम्यान, "दहशतवादी कारवायांबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, पाहलगाम या ठिकाणी झालेल्या हल्ल्यात खून का बदला खून पाहिजे, अशी भावना होती. आता पूर्वीचा भारत नाही, घुसके मारनेवाला भारत आहे. आपल्या सैन्याने ताकद दाखवली, ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाला. मोदी यांचे अभिनंदन करतो, ज्यांनी महिलांचे कुंकू पुसलं त्यांना धडा शिकवला. बाप बाप होता है, जोपर्यंत दशहतवाद संपत नाही तोपर्यंत ऑपरेशन सिंदूर संपणार नाही, जे शिष्टमंडळ इतर देशांमध्ये भारताची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी जाणार आहे. त्यात तुमचा खासदार श्रीकांत शिंदे जाणार आहे, हीअभिमानाची बाब आहे. पाकिस्तानने आजपर्यंत दहशतवादाला कसा पुढे आला, कसा पाठिंबा दिला, हे सांगण्यासाठी ही टीम तयार करण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरचा दणका पाहून पाकड्यांचे झाले वांदे, दहशतवादाचा बुरखा फाडण्यासाठी चालला आहे, श्रीकांत शिंदे," असेही एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जुन्या नाशिक परिसरातील त्रंबक पोलीस चौकी पाठीमागे इमारत कोसळली

Latest Marathi News Update live : मध्य रेल्वेच्या सुमारे 720 आणि पश्चिम रेल्वेच्या 100 लोकल फेऱ्या रद्द

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींना रोजगारात नवीन प्रश्न निर्माण होतील, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार