महापालिका निवडणुकांत भाजपने राज्यभर आघाडी घेत सर्वाधिक जागा पटकावल्या आहेत. शिंदे गटाची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर असली तरी मुंबईत मात्र त्यांना अपेक्षित यश मिळालं नाही. मुंबईत भाजपचे 89 नगरसेवक निवडून आले, तर शिंदे गट केवळ 29 जागांवर अडखळला. याउलट ठाकरे गटाने मुंबईत दमदार कामगिरी करत 65 जागा मिळवल्या.
या निकालानंतर महायुतीत अस्वस्थता वाढल्याचं चित्र आहे. शिंदे गटाकडून भाजपविरोधात नाराजी व्यक्त केली जात असून, काही मतदारसंघ मुद्दाम कठीण देण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. तसेच काही ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांनी सहकार्य न केल्याने नुकसान झाल्याचंही बोललं जात आहे. ही तक्रार थेट दिल्लीपर्यंत पोहोचल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मुंबईत भाजप सर्वात मोठा पक्ष असला तरी बहुमताचा आकडा गाठता आलेला नाही. त्यामुळे महापौरपदासाठी शिंदे गटाचा पाठिंबा महत्त्वाचा ठरणार आहे. आता मुंबईचा महापौर नेमका कोणाच्या गळ्यात पडतो, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
थोडक्यात
महापालिका निवडणुकांत भाजपने राज्यभर आघाडी घेतली.
भाजपने सर्वाधिक जागा पटकावल्या.
शिंदे गटाची शिवसेना दुसऱ्या क्रमांकावर
मुंबईत शिंदे गटाला अपेक्षित यश मिळाले नाही.
मुंबईत भाजपचे 89 नगरसेवक निवडून आले.
शिंदे गट केवळ 29 जागांवर अडखळला
ठाकरे गटाने मुंबईत दमदार कामगिरी करून 65 जागा जिंकल्या.