थोडक्यात
मतदारयादी खोटी आहे, त्याच मतदारयादीवर लोकसभेत निवडून आल्या ना. आम्ही पराभव मान्य केला आणि कामाला लागलो.
आमची कमी असेल म्हणून आम्हाला नाकारलं आणि कामाला लागलो.
मोर्चा आणि भाषणांची आवड भारी आणि काम थांबते सारी गर्दी मोठी होते, मात्र काहीही होत नाही.
आज भाजपने मुंबईमध्ये मुक मोर्चा काढला. यावेळी अनेक नेते या मोर्चाला उपस्थितीत होते. यावेळी भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी भाषण करत विरोधकांवर हल्लाबोल केला.
यावेळी त्या म्हणाल्या की, "गेल्या काही दिवसांपासून महाभकास आघाडी आणि आत्ता जोडले गेलेले नाटकीकरण आपण पाहातोय. सगळं काही तथ्यरहीत आहे. मतदारयादी खोटी आहे, त्याच मतदारयादीवर लोकसभेत निवडून आल्या ना. आम्ही पराभव मान्य केला आणि कामाला लागलो. आमची कमी असेल म्हणून आम्हाला नाकारलं आणि कामाला लागलो. मोर्चा आणि भाषणांची आवड भारी आणि काम थांबते सारी गर्दी मोठी होते, मात्र काहीही होत नाही, विकास करायचा असेल तर महायुती सोबत लोकं आहेत."
पुढे त्या म्हणाल्या की, "ईव्हीएम, मतदारयादीवर हे निवडून आले तेव्हा चांगली होती यंत्रणा मात्र, पराभव झाला की यंत्रणा चुकीची होते. यांचे खासदार आले तेव्हा यंत्रणा चांगली आणि नाही की खराब लोकसभावेळी संविधान बदलणार, असा फेक प्रचार केला. जनता भुलली तेव्हा जनतेला यांचा कपटीडाव लक्षात आला नाही."
पुढे त्या म्हणाल्या की, "पार्श्वभूमी पराभवाची विरोधकांकडून केली जात आहे. महाराष्ट्रातील जनता यांना माती खायला लावणार, त्यामुळे आत्तापासून यांची ट्रायल सुरु आहे. उद्याचे खापर आपल्या सरकारच्या नावाने फोडायची यासाठी हा प्रयत्न करतयं. स्टॅंडअप काॅमेडीला नाही तर जनतेच्या विकासासाठी सोबत राहाते हे यांना लक्षात आलं पाहिजे."
पुढे त्या म्हणाल्या की, "यांचा शो असत्याचा शो आहे, सत्याची कास धरत आम्ही बसलो आहोत. ईव्हीएम आणि मतदारांवर पराभवाचे हे लोकं खापर फोडणार आहे, देश संविधानावर चालतो. खोटं बोला रेटून बोला हेच यांचे सुरु आहे. महाराष्ट्रातील जनता यांना थारा देणार नाही, खोटेपणा ओरडून सांगत असताना भाजपचे आमचे कार्यकर्ते, प्रदेशाध्यक्ष मुंबई अध्यक्ष, नेते लोढाजी यांच्या नेतृत्वात आंदोलन आम्ही करतोय."