ताज्या बातम्या

Deven Bharti Mumbai Police : देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी नियुक्ती

Published by : Siddhi Naringrekar

देवेन भारती यांची मुंबईच्या विशेष पोलिस आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. देवेन भारती यांना सामावून घेण्यासाठी विशेष आयुक्तपदाची निर्मिती केली जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे देवेन भारती यांच्या नियुक्तीसाठी अनुकुल असल्याच समजतं. देवेन भारती हे 1994 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. 2014 ते 2019 दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात मुंबईतील प्रभावी पोलीस अधिकारी होते.

राज्यातील सत्तांतरानंतर विविध विभागांमध्ये मोठे फेरबदल होत असल्याचं चित्र आहे. पोलीस प्रशासनातही बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा तडाखा सुरू आहे. अशातच आयपीएस अधिकारी देवेन भारती यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती केल्याची माहिती मिळाली.

त्यांना अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून बढती देऊन दहशतवाद विरोधी पथकात नेमण्यात आले. मग 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळात IPS अधिकार्‍यांसाठी सर्वांत कमी दर्जाची असाईन्मेंट समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्र स्टेट सिक्युरिटी कॉर्पोरेशनचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालकदावरुन देवेन भारती यांना हटवण्यात आलं. 13 डिसेंबर 2022 रोजी देवेन भारती यांच्याजागी सहआयुक्त (वाहतूक) राजवर्धन यांची नियुक्ती करण्यात आली आणि तेव्हापासून ते नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.

Lok Sabha Election 2024: लोकसभा निवडणुकीचा तिसरा टप्पा! राज्यातील लोकसभेच्या 11 जागांवर आज मतदान

Daily Horoscope 07 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचं नशीब सोन्यासारखं चमकणार; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 07 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

ICSE 2024 Results: आयसीएसई बोर्डाचा १०वी, १२वीचा निकाल जाहीर; यंदा मुलींनी मारली बाजी!

Rohit Pawar: रोहित पवारांचा विरोधकांवर हल्लाबोल; सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हणाले...