Sanjay Raut, Devendra Bhuyar Team Lokshahi
ताज्या बातम्या

"...तर संजय राऊत पुन्हा अपक्षांवर खापर फोडतील, माझा मतदानाचा अधिकार त्यांना द्या"

विधानपरिषद निवडणुकीपूर्वीच देवेंद्र भुयार यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Team Lokshahi

राज्यसभा निवडणूकीत शिवसेना नेते संजय राऊत यांनी अपक्ष आमदार देवेंद्र भुयार यांनी मतदान केलं नसल्याचा आरोप केला होता. आता विधानपरिषद निवडणूकीत सुद्धा देवेंद्र भुयार यांनी शंका उपस्थित करु नये म्हणून माझ्या मतदानाच्या टेबल समोर संजय राऊत यांना उभे करा अन्यथा माझ्या मतदानाचा अधिकार संजय राऊत यांना देऊन टाका. तसं मी निवडणूक विभागाला देखील पत्र लिहणार असल्याची प्रतिक्रिया आमदार देवद भुयार यांनी दिली. मी पूर्वीपासून महाविकासआघाडी सोबत आहे. माझ्यावर शंका घेण्याचं कारण नाही. विधानपरिषद निवडणूकीत महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून येईल यात काही शंका नाही. विधान परिषदेत जर महाविकास आघाडीचा एखादा उमेदवार पराभूत झाला, तर संजय राऊत पुन्हा अपक्षांवर खापर फोडतील हे मला शंभर टक्के माहित आहे. त्यामुळे माझ्या वतीने संजय राऊत यांना मतदानाचा अधिकार द्यावा अशी मागणी आमदार देवेंद्र भुयार यांनी केल्यानं खळबळ उडाली आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विजयी मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेनेचे नेते वरळी येथील डोम सभागृहात दाखल

Sandeep Deshpande : 'आवाज मराठीचा!', विजयी मेळाव्यासाठी संदीप देशपांडेंचा खास टी-शर्ट; मराठीची मुळाक्षरेही दिसताहेत उठून

Maharashtra Rain Update : राज्यात पावसाचा जोर कायम; साताऱ्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

Satara School : 'या' तालुक्यातील 334 शाळांना पावसाळी सुट्टी जाहीर