Devendra Fadnavis Lokshahi
ताज्या बातम्या

अनाथांच्या आरक्षणाबाबत उपमुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान, ट्वीटरवर म्हणाले; "अनाथांना आरक्षण देण्याचा निर्णय..."

मराठा आरक्षणाचा प्रश्न देशभर गाजत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाथांच्या आरक्षणाबाबत ट्वीटरवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

Published by : Naresh Shende

Devendra Fadnavis Tweet : मराठा आरक्षणाचा प्रश्न देशभर गाजत असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाथांच्या आरक्षणाबाबत ट्वीटरवर मोठी प्रतिक्रिया दिली आहे. अनाथांना आरक्षण निर्णय देण्याची संधी मला मिळाली आणि त्यातून अनेकांना लाभ झाला. अनाथांना आरक्षण देण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. आता तर आम्ही अनाथांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे, असं फडणवीसांनी ट्वीटरवर म्हटलं आहे.

देवेंद्र फडणवीस ट्वीटरवर काय म्हणाले?

अनाथांना आरक्षण निर्णय देण्याची संधी मला मिळाली आणि त्यातून अनेकांना लाभ झाला. अनाथांना आरक्षण देण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य होते. आता तर आम्ही अनाथांना मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. आश्विन आगवणे यांनी अतिशय कष्टाने आणि जिद्दीने वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आणि ते या वर्गवारीचा लाभ घेत देशातील पहिले वकील बनू शकले.

प्राध्यापक तर होतेच, आता अ‍ॅडव्होकेट सुद्धा झाले. महाराष्ट्राच्या या सुपुत्राचे अतिशय मनापासून अभिनंदन आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी अतिशय मनापासून शुभेच्छा !आश्विनला मी एकच सांगीन, ज्यांना कुठूनच मदत मिळत नाही, कायम त्यांच्या मदतीला धावून जा!तीच खरी ईश्वरसेवा आहे...तीच खरी मानवसेवा आहे...तीच खरी देशसेवा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : उपेंद्र पावसकरला 20 तारखेपर्यंत पोलीस कोठडी

Buldhana : मलकापूरजवळ भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू, पाच जखमी

Sanjay Raut : आनंद दिघे नेते, उपनेते नाही, तर...; शिंदेंच्या जाहिरातीवरुन राऊतांची टीका

Nanded : नांदेड जिल्ह्यात पावसाचे थैमान; गोदावरी नदी धोक्याच्या पातळीजवळ