मुंबई येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये 'व्हेस्ट समिट 2025' सुरु आहे. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीदेखील हजेरी लावली. फडणवीसांनी केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याबरोबर विविध ऑडिटोरियमची पहाणी केली. त्यानंतर नी एकत्र पत्रकार परिषद महाराष्ट्रातील रेल्वे प्रकल्पांबाबत मोठमोठ्या घोषणा केल्या. महाराष्ट्रात 1 लाख 73 हजार कोटींची कामे सुरू आहेत. यात मुंबईसह इतर परिसरात 17 हजार कोटींची कामे सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.
त्याच प्रमाणे, "राज्यात छत्रपती शिवाजी महाराज सर्किट ट्रेन सुरु करणार आहे. या सर्किट ट्रेनने राज्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देता येणार आहे. सर्किट ट्रेनने 10 दिवस प्रवास करता येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हे देखील या ठिकाणी सुरू होणाऱ्या ज्याच्यामध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारची हायकोलीक रेल्वे दहा दिवसाचा टूर हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जी काही विविध महत्त्वाचे किल्ले आहेत किंवा जागा आहेत आणि अर्थातच त्याच्याशी संबंधित इतर जे काही आपले सांस्कृतिक स्थळ आहेत याला जोडणारा येथील सुरुवात ही रेल्वे विभाग त्या ठिकाणी करतो आहे", असेही देवेंद्र फडणवीसांनी म्हटले.