Devendra Fadnavis a Eknath Shinde have had a phone conversation regarding the Mumbai municipal corporation mayoral dispute  
ताज्या बातम्या

Devendra Fadnavis a Eknath Shinde : "मोठा ट्विस्ट! फडणवीस-शिंदेंची फोनवर चर्चा, महापौर कोणचा?"

राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होऊनही अजून महापौरपदाचा निर्णय लांबलेला आहे.

Published by : Riddhi Vanne

राज्यातील महापालिका निवडणुकांचे निकाल जाहीर होऊनही अजून महापौरपदाचा निर्णय लांबलेला आहे. विशेषतः मुंबई महापालिकेत नेमकी सत्ता कोणाची, याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपसमोर महापौरपदाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

या निवडणुकांमध्ये राज्यातील राजकीय चित्र पूर्णपणे बदललेले दिसले. एकाच आघाडीत असलेले पक्ष महापालिका निवडणुकीत एकमेकांविरोधात उभे ठाकले. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार गटाने भाजप आणि शिंदे गटाविरोधात लढत दिली, मात्र अपेक्षित यश मिळाले नाही. उलट भाजपाने अनेक शहरांमध्ये थेट सत्ता मिळवत आपली ताकद दाखवली.

मुंबईत भाजप पहिल्या क्रमांकावर, ठाकरे गट दुसऱ्या, तर शिंदे गट तिसऱ्या क्रमांकावर राहिला. भाजप आणि शिंदे गटाने एकत्र निवडणूक लढवली असली, तरी सत्ता स्थापनेसाठी दोघांनाही एकमेकांवर अवलंबून राहावे लागणार आहे. भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्या असल्या तरी शिंदे गटाशिवाय सत्ता शक्य नाही.

महापौरपदासाठी अडीच-अडीच वर्षांचा फॉर्म्युला चर्चेत आला असून, शिंदे गटाने आपले नगरसेवक सुरक्षित ठिकाणी ठेवले आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यात फोनवर चर्चा झाली असून मुंबईत महायुतीचाच महापौर होणार, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. अफवांना थारा न देता लवकरच तोडगा निघेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

थोडक्यात

  1. राज्यातील महापालिका निवडणुकेचे निकाल जाहीर झाले आहेत.

  2. तरीही महापौरपदाचा निर्णय अद्याप लांबलेला आहे.

  3. मुंबई महापालिकेत सत्ता कोणाची असेल याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

  4. सर्वाधिक जागा मिळवूनही भाजपसमोर महापौरपदाचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा