थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
मराठवाड्यात अतिवृष्टी झाली आणि शेतींचे मोठे नुकसान झाले. पाऊस इतका जास्त पडला की, फक्त पिकेच नाही तर शेतजमिनी आणि जनावरेही वाहून केली. शेतकऱ्यांसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली. मात्र, जेवढ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले, त्यापुढे ही मदत खूपच कमी असल्याचे विरोधीपक्षाने म्हटले. त्यानंतर उद्धव ठाकरे थेट मराठवाड्याच्या दाैऱ्यावर गेले. तिथे त्यांनी शेतकऱ्यांसोबत संवाद साधला आणि राज्य सरकारची पहिल्या टप्प्यातील मदत खरोखरच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली का? याची माहिती घेतली. हेच नाही तर आमचे सरकार असताना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली होती. या सरकारनेही करावी, याकरिता उद्धव ठाकरे आग्रही आहेत. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या विषयावर ते सतत सरकारवर टीका करताना दिसत आहेत. त्यामध्येच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल मोठे विधान केले.
देवेंद्र फडणवीस शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोलताना म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला जे मिशन दिले आहे, नैसर्गिक शेतीचे त्यानुसार आपल्याला राज्यातील 25 हजार हेक्टर शेती नैसर्गिक शेतीखाली आणायची आहे. मी बियाणांच्या कंपन्यांना तशा प्रकारची विनंती केली आहे. कर्जमाफीबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आपण प्रत्येकवेळी सांगितले आहे की, कर्जमाफी महत्वाचीच आहे. पण कर्जमाफी हे अंतिम उत्तर नाहीये.
अंतिम उत्तर हे शेतीमध्ये शाश्वतता आणणे हे आहे. त्याकरिता शेती फायद्याची झाली पाहिजे. उत्पादनाचा जो काही खर्च आहे तो कमी झाला पाहिजे. उत्पादकता वाढवणे हाच यावरील उपाय आहे. याकरिता आपल्याला नवीन शेती पद्धत लागेल. शेतीच्या नवीन टेक्निक आपल्याला वापराव्या लागतील. त्यानुसार आपण स्मार्टसारखे प्रकल्प हातात घेतली आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनी मी विनम्र अभिवादन करतो, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. आता जर कर्जमाफी केली तर बॅंकांचा मोठा फायदा होईल. जूनमध्ये कर्जमाफी केली तर बॅंकांचा फायदा होणार नसल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते. त्यावरून त्यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. केंद्र शासनाच्या पथकाकडून नुकसानीची पाहणी उशिरा करण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आला होता.