ताज्या बातम्या

'देशातील जनतेची दिशाभूल करू नका' विधानसभा मतांमधील तफावतीवर फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर

महाविकास आघाडीच्या निवडणुकीतील पराभवानंतर ईव्हीएमवर शंका, फडणवीसांचे शरद पवारांना प्रत्युत्तर: 'देशातील जनतेची दिशाभूल करू नका'

Published by : shweta walge

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा तारुण पराभव झाला तर महायुतीचा दणदणीत विजय झाला. या निवडणुकीने महायुतीला 231 जागा जिंकल्या तर महाविकास आघाडीला 50 जागा मिळाल्या. यानंतर त्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून ईव्हीएमवर शंका व्यक्त केली जात आहे. यावरुनच शरद पवार यांनीही आज मतदानाची आकडेवारी संशय व्यक्त केला. यावरुन राज्याचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेच्या निकालाची आकडेवारी देत ट्विटद्वारे प्रत्युत्तर दिले आहे.

 देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले, श्री शरद पवार साहेब, आपण ज्येष्ठ नेते आहात, किमान आपण तरी देशातील जनतेची दिशाभूल करू नका. जास्त मतं मिळूनही कमी जागा कशा? चला 2024 लोकसभेत काय झाले ते पाहू, भाजपाला मतं 1,49,13,914 आणि जागा 9, पण काँग्रेसला मतं 96,41,856 आणि जागा 13. शिवसेनेला 73,77,674 मतं आणि 7 जागा, तर राष्ट्रवादी-शरद पवार गटाला 58,51,166 मतं आणि 8 जागा. 2019 च्या लोकसभेचे उदाहरण तर फारच बोलके आहे. काँग्रेसला 87,92,237 मतं होती आणि 1 जागा मिळाली, तर तत्कालीन राष्ट्रवादीला 83,87,363 मतं होती आणि जागा 4 आल्या. पराभव स्वीकारला तर यातून लवकर बाहेर याल! तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Fort Of Maharashtra in UNESCO : अभिमानास्पद ! महाराष्ट्रातील 12 गड-किल्ले आता युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत

Latest Marathi News Update live : महाराष्ट्रातील 12 किल्ल्यांना जागतिक यादीत स्थान

Digital Arrest Cyber Crime : विश्वास नांगरे-पाटील यांचा AI फोटो वापरून व्हिडिओ कॉल; तब्बल 78 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक

Janasuraksha Bill : विरोधकांच्या सभात्यागानंतरही विधान परिषदेत जनसुरक्षा विधेयक मंजूर