ताज्या बातम्या

Devendra Fadnvis : सिंहगड रस्त्यावरील उड्डाणपूलाच्या शुभारंभाला विलंब; मुख्यमंत्री फडणवीस पुण्यात असूनही कार्यक्रमासाठी गैरहजर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पुण्यातील सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाच्या उद्घाटनासाठी त्यांनी अनुपस्थिती लावली.

Published by : Prachi Nate

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुण्यात सलग दोन दिवस दौरा असताना, सिंहगड रस्त्यावर उभारलेल्या उड्डाणपुलाच्या उदघाटनाला ते गैरहजर राहिले. दरम्यान मुख्यमंत्री कार्यालयाकडून वेळ मिळाला नसल्याने हा महत्त्वाचा कार्यक्रम लांबणीवर पडला आहे. महापालिका प्रशासनाच्या माहितीनुसार, उद्घाटन 1 मे रोजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, पुणेकरांना उष्णतेच्या झळात आणि तीव्र वाहतूक कोंडीत अडकून प्रवास करावा लागत आहे. पुणे महापालिकेने सुमारे 118 कोटी रुपये खर्च करुन राजाराम पूल ते फनटाइम थिएटर या दरम्यान तीन उड्डाणपूल बांधण्याचे काम हाती घेतले आहे. या प्रकल्पाची सुरुवात सप्टेंबर 2022 मध्ये झाली होती.

यापैकी राजाराम पूल चौकातील 650 मीटर लांबीचा उड्डाणपूल काही महिन्यांपूर्वी उद्घाटीत झाला आहे. दुसऱ्या टप्प्यात विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर दरम्यान 2120 मीटर लांबीचा उड्डाणपूल आणि माणिकबाग ते हिंगणे दरम्यान 1540 मीटर लांबीचा उड्डाणपूल उभारण्यात येत आहे. विठ्ठलवाडी ते फनटाइम थिएटर या भागातील उड्डाणपूलाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे.

तर, माणिकबाग ते हिंगणे दरम्यान पेट्रोलपंपाच्या भागातील उड्डाणपूलाचे 70 टक्के काम पूर्ण झाले असून, शिल्लक असलेल्या कामासाठी सुमारे दोन महिने लागणार आहेत. उदघाटन लांबणीवर पडल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे सूर उमटत आहेत.दरम्यान 1 मे रोजी मुख्यमंत्री या पुलाचे उदघाटन करतील अशी माहिती देण्यात येत आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा