गडचिरोलीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट दिली. C60 जवानांनी विवीध चकमकीत शौर्य दाखवल अश्या अधिकाऱ्याचा सत्कार आणि पोलिस कॅलेंडर 2025 च लोकार्पण केलं. दरम्यान मुख्यमंत्र्यांनी शौर्य दाखवणाऱ्या प्रत्येकाला भारतीय संविधान पुस्तक भेट देऊन स्वागत केले. या सर्वांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून 86 लाखांचे बक्षिस दिले जाणार आहे अशी माहिती देण्यात आली.
माओवाद्यांवर जनतेचा विश्वास नाही, तर....- देवेंद्र फडणवीस
याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, नववर्षाच पहिला दिवस गडचिरोलीत घालवता आला याचा मला आनंद आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पोलिसांनी माओबाद हा जवळपास संपुष्टात आणण्याच काम सूरू केलं आहे. आज पोलीस आणि जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून जे उपक्रम सूरू झाले त्याचा परिणाम असा आहे, यामुळे गडचिरोली मधील एकही युवक युवती माओवाद्यात गेले नाही.. तसेच माओवाद्यांवर जनतेचा विश्वास नाही, जनतेचा विश्वास आपल्या देशावर राज्यावर आणि संविधांनावर आहे, त्यामुळे कोणी ही संविधांनाच्या विरोधात चळवळीत जाण्यासाठी तयार नाही हे आपल्याला पाहायला मिळत आहे...
आत्मसमर्पणामुळे आज माओवादांची कंबर मोडण्यात आली- देवेंद्र फडणवीस
38 वर्षापासून महत्त्वाची भुमिका बजावणाऱ्या तारा अक्का, आणि ज्यांनी मोठीं केडर निर्माण केलं आहे, अश्या अकरा लोकांनी आज आत्मसमर्पण केलं आहे यांच्या आत्मसमर्पणामुळे आज माओवादांची कंबर मोडण्यात आली आहे... भारताने निर्माण केलेल्या न्यायव्यवस्थामुळे मिळेल असा विश्वास आता निर्माण होत आहे.. येणाऱ्या काळात माओवाद संपलेले दिसेल.
मोदी अमित शहा यांची मोलाची मदत- देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत
यामध्ये मोलाची मदत केंद्राच्या माध्यमातून आपल्याला मिळते... अमीत शहा यांनी विशेष मोहीम सूरू केली आहे. त्यासाठी मोदी अमित शहा यांची मदत मिळते. गडचिरोली दलाने महाराष्ट्र सरकारची मान अभिमानाने उंचावली आहे. आपल्या कार्यात लागेल ती मदत करत राहील...2025 ला चांगला सूर्य उगवला आहे, ही अशीच विकासाची वाटचाल पुढें सूरू राहील.. असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.