Devendra Fadnavis  Lokshahi
ताज्या बातम्या

Vidhan Parishad Election Result: उपमुख्यमंत्री फडणवीसांचं मोठं विधान; म्हणाले, आम्हाला आमची मतं मिळालीच, पण..."

विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज सायंकाळी मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे.

Published by : Naresh Shende

Devendra Fadnavis Press Conference: विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडली. त्यानंतर आज सायंकाळी मतमोजणी करण्यात आली. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या पाचही उमेदवारांचा विजय झाला आहे. त्यामुळे महायुतीने ९ पैकी ९ जागांवर बाजी मारली आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठं विधान केलं आहे. आम्हाला आमची मतं मिळालीच पण महाविकास आघाडीची मतंदेखील आमच्याकडे आलेली आहेत. त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे, असं फडणणीस म्हणाले.

माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

आमच्या महायुतीने जेव्हा ९ उमेदवार लढवण्याचा निर्णय घेतला, त्यावेळी अनेक लोक वल्गना करत होते की, आमचे उमेदवार पडतील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार येतील, अशाप्रकारे सांगितलं जात होतं. पण आज आपल्याला पाहायला मिळतंय की, आम्हाला आमची मतं मिळालीच पण महाविकास आघाडीची मतंदेखील आमच्याकडे आलेली आहेत. त्यामुळे एक चांगला विजय आम्हाला प्राप्त झालेला आहे. निवडून आलेल्या आमच्या ९ सदस्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो.

आमच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे यांचाही आज विजय झाला आहे. सर्वसामान्य घरातले, सर्व समाजातील आणि सामान्य माणसांमध्ये काम करणारे, अशाप्रकारचे आमचे उमेदवार आहेत. ज्यांनी आमच्या महायुतीवर प्रचंड विश्वास दाखवला, त्या सर्व मतदारांचे मी आभार मानतो. ही सुरुवात आहे. विधानसभेच्या निवडणुकीतही मोदींच्या मार्गदर्शनाखाली आमची महायुती पुन्हा निवडून येईल, हा विश्वास आज मी व्यक्त करतो.

सदाभाऊ खोत जनतेचा माणूस आहे. शेतकऱ्यांचा नेता आहे. जनतेसाठी २४ तास राबणार नेता आहे. त्यामुळे निश्चितपणे आमच्या महायुतीच्या आमदारांनी विश्वास दाखवलाच, पण इतरही आमदारांनी त्यांच्यावर विश्वास दाखवला. त्यांच्या एकूण मतांची बेरीज बघितली, तर त्यांना साडे सव्वीस मतं मिळाली आहेत. त्यामुळे मोठा विजय त्यांना मिळाला आहे.

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार

पंकजा मुंडे (विजयी) - २६

अमित गोरखे (विजयी) - २६

परिणय फुके (विजयी) - २६

सदाभाऊ खोत (विजयी) - २६.५

योगेश टीळेकर (विजयी) - २६.५

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा