Devendra Fadnavis - Akbaruddin Owaisi Team Lokshahi
ताज्या बातम्या

"औरंगजेब हिंदुंचा तर सोडा, मात्र मुस्लिमांचाही नेता होऊ शकत नाही"

Devendra Fadnavis वर्सोवा महोत्सावाच्या निमित्ताने मुंबईत बोलत होते.

Published by : Sudhir Kakde

मुंबई : राज्याचे विरोधीपक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आज मुंबईतील वर्सोवामध्ये (Versova Festival, Versova) आयोजित वर्सोवा महोत्सवाला उपस्थिती लावली होती. फडणवीसांनी या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधला. लीलावतीमध्ये एखादा फोटो ट्विट केल्यावर कारवाई करणारे, औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवणाऱ्या ओवैसींवर (Akbaruddin Owaisi) कारवाई करत नाहीत. हनुमान चालिसा (Hanuman Chalisa) म्हणणाऱ्यांवर कारवाई होते, मात्र काश्मीर तोडण्याचा नारा देणाऱ्यांवर कारवाई होत नाही.

अकबरुद्दीन ओवैसींना मी सांगू इच्छितो की, औरंगजेबाच्या कबरीवर डोकं टेकवून तुम्ही देशातील देशभक्त मुस्लिमांचा अपमान आहे. देशातील हिंदुच नाही तर मुस्लीमांचा देखील औरंगजेब नेता होऊ शकत नाही. कारण त्याने या देशावर आक्रमन केलं होतं. छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरी समोर डोकं ठेवणाऱ्या लोकांवर कारवाई झालीच पाहिजे. आम्ही हे सहन करणार नाही, त्यांची जागा त्यांना दाखवणार आहोत. उद्धव ठाकरे सध्या ज्या लोकांसोबत बसले आहेत, त्यांचीच निती ते सध्या चालवत आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांनी कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना सत्ताधाऱ्यांवर टीका केली. मेट्रोचं उरलेलं थोडसं काम आता 4 वर्ष पुर्ण होऊ दिलं जाणार नाही. मात्र काळजी करु नका, योग्य वेळी योग्य न्याय जनता करेल. मुंबईच्या विकासाच्या हत्याऱ्यांना जनता माफ करणार नाही असं फडणवीस म्हणाले. भारतीताई लवेकर यांनी केलेल्या कामाबद्दल फडणवीसांनी त्यांचं कौतूक केलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा