Devendra Fadnavis Team Lokshahi
ताज्या बातम्या

"बाबासाहेबांच्या स्मारकारकासाठी काँग्रेसनं जागा दिली नाही, PM मोदींनी 3 दिवसांत इंदू मिलची जागा दिली"

देवेंद्र फडणवीस लातूरमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात बोलत होते.

Published by : Sudhir Kakde

लातूर : शहरातील आंबेडकर पार्क येथे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर (Dr., Babasaheb Ambedkar) यांच्या भव्य 72 फुटाचा पुतळ्याचा (Statue of Knowledge) अनावरण सोहळा आज पार पडला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), केंद्रीय मंत्री रामदास आठवले, गिरीश महाजन, खासदार सुधाकर शृंगारे, संभाजी पाटील निलंगेकर यांच्या सह अनेक मान्यवरांच्या उपस्थित हा सोहळा पार पडला.

नरेंद्र मोदीं जेव्हा पंतप्रधान झाले तेव्हा त्यांना विनंती केली त्यानंतर इंदू मिल जागा आम्हाला मिळली त्यासाठी सुध्दा आम्हाला खुप संघर्ष करावा लागला असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसंच इंदू मिलसाठी आमच्या सरकारने 2300 कोटी रुपये दिले, लंडणमध्ये बाबासाहेब आंबेडकर यांचं घर आमच्या काळात केंद्रातील भाजपा सरकारने घेतलं, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

इंदू मिलसाठी जागा घेण्यासाठी संघर्ष करावा लागत होता, आमचे भीमसैनिक त्यासाठी तुरुंगात गेले. दोन्हीकडेही काँग्रेसचं सरकार होतं, बाबासाहेबांच्या नावानं मत मागायचे, मात्र सुईएवढी जागासुद्धा देत नव्हते. पुढे केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार आलं आणि पंतप्रधान मोदींनी जागा मिळवून दिली. 2300 कोटी रुपयांची जागा मोदीजींनी तीन दिवसांत महाराष्ट्र सरकारला दिली असं फडणवीसांनी सांगितलं.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा