मंत्री जयकुमार गोरे एका महिलेला विवस्त्र फोटो पाठवल्याच्या आरोपांमुळे चर्चेत आले होते. त्या प्रकरणात कोर्टाकडून गोरे यांना दिलासा देखील मिळाला होता. मात्र त्यानंतर हे प्रकरण पुन्हा चर्चेत आलं. मंत्री जयकुमार गोरे यांच्यावर आरोप करणाऱ्या महिलेवर खंडणी प्रकरणात पोलिसांनी अटकेची कारवाई केली.जयकुमार गोरे प्रकरणात शरद पवार गटाचा हात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात रोहित पवार, सुप्रिया सुळे आणि प्रभाकर देशमुख यांचं नाव घेत आरोप केला आहे.