ताज्या बातम्या

Buldhana Accident : अपघाताच्या घटनेची चौकशी करणार; उपमुख्यमंत्री फडणवीसांची माहिती

समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे.

Published by : Siddhi Naringrekar

Buldhana Accident : समृद्धी महामार्गावर अपघातांची मालिका सुरु आहे. अनेक नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. समृद्धी महामार्गावर सिंदखेडराजा येथील पिंपळखुटा गावात हा भीषण अपघात झाला. बस डिव्हायडरवर आदळली. त्यानंतर बसने पेट घेतला आणि त्यात 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

बसचा टायर फुटला. त्यामुळे बस खांबाला जाऊन धडकली. त्यानंतर ही बस अनियंत्रित झाली आणि समृद्धी महामार्गावरील डिव्हायडरला जाऊन आदळली. त्यामुळे बस पलटी झाली. बस पलटी होताच बसला भीषण आग लागली. काही प्रवाशांनी काचेची खिडकी तोडली आणि बाहेर पडले. या अपघातातून ड्रायव्हरसह 8 जण बचावले आहेत. मात्र 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला.

याबाबतचे आदेश देण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. उपाययोजना करत आहोत. याठिकाणी अपघात होणार नाहीत यासाठी प्रयत्न करत आहोत. या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. असे फडणवीस म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Ganesh Chaturthi 2025 Wishes : आला देव घरी आला, आमचा गणराया आला..! गणेश चतुर्थीनिमित्त आपल्या प्रियजनांना Whatsapp Status, Facebook द्वारे पाठवा 'या' मंगलमय शुभेच्छा

Lalbaugcha Raja 2025 : मुंबईत गणेशोत्सवासाठी लालबागच्या राजाभोवती आधुनिक सुरक्षा; एआय तंत्रज्ञानाचा वापर

Uddhav Thackeray : ठाकरे गटाला धक्का; माजी महापौर शिंदे गटात दाखल