Devendra Fadnavis
Devendra Fadnavis  Team Lokshahi
ताज्या बातम्या

बैल हा धावणारा प्राणी हे आम्ही सिद्ध केलं - देवेंद्र फडणवीस

Published by : Siddhi Naringrekar

मुंबई उच्च न्यायालयाने 2011 साली बैलगाडा शर्यतीवर बंदी आणली होती. त्यानंतर 20 एप्रिल 2012 रोजी राज्य सरकारने परिपत्रक काढून राज्यात बैलगाडी शर्यतीवर बंदी घालण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर डिसेंबर 2021 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीवरची बंदी हटवली होती. त्यावर कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. त्याबाबत आता सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली आहे.

सुप्रीम कोर्टाकडून बैलगाडी शर्यतीला परवानगी मिळाली आहे. त्यामुळे बैलगाडी शर्यतीचा मार्ग आता मोकळा झाला आहे. महाराष्ट्र सरकारचा कायदा वैध आहे तसेच कायद्यात केलेले बदल हे समाधानकारक आहेत. त्यामुळे बैलगाडी शर्यतीवर बंदी नाही. असे सुप्रीम कोर्टाकडून सांगण्यात आले आहे

याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, बैल हा धावणारा प्राणी आहे. मी मुख्यमंत्री असताना तो रिपोर्ट आम्ही तयार केला. तो रिपोर्ट आम्ही सर्वोच्च न्यायालयाला सादर केला. आता ज्यावेळेस केस लागली. त्यावेळी हे आमचे नवीन सरकार आल्यानंतर आम्ही विनंती केली. मला अतिशय आनंद आहे. आज जो निर्णय आला आहे. हा शेतकऱ्यांचा आणि महाराष्ट्राचा मोठा विजय आहे.

नारायण राणेंसाठी राज ठाकरे मैदानात; राज ठाकरेंची आज कणकवलीत सभा

Daily Horoscope 4 May 2024 Rashi Bhavishya: 'या' राशींच्या लोकांचे वैवाहिक आयुष्यातील एक उत्तम दिवस ; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 4 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

'आमचं सरकार आलं तर 50 टक्के आरक्षणाची मर्यादा हटवू' राहुल गांधींची मोठी घोषणा

Garlic: उन्हाळ्यात 'या' लोकांनी लसूण खाणे टाळावे