ताज्या बातम्या

2024मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा असणार की नाही? फडणवीस म्हणाले...

राज्यात होणाऱ्या विधानसभा आणि देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे वेध सर्वपक्षीयांना लागले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

राज्यात होणाऱ्या विधानसभा आणि देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकांचे वेध सर्वपक्षीयांना लागले आहेत. यासोबतच मुख्यमंत्रीपदाच्या चेहऱ्याचीसुद्धा चर्चा रंगली आहेत.

याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान चर्चेचा विषय आहे. एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत फडणवीस म्हणाले की, जर त्या वेळी आमच्या पक्षाला कोणता दुसरा निर्णय घ्यायची गरज असेल, तर पक्ष तो निर्णय घेईल. पण मला वाटत नाही की दुसरा कुठला निर्णय घेण्याची गरज आहे. कोणत्याही पक्षाला आणि कार्यकर्त्याला हेच वाटत असतं की आमचा नेता मुख्यमंत्री व्हावा. पण २०२४ ची निवडणूक एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असतानाच आम्ही लढवू. जो मुख्यमंत्री असतो, तोच सरकारचा नेता असतो, त्याच्याच नेतृत्वात निवडणुका लढवल्या जातात.

तसेच पाच वर्षं मुख्यमंत्री असताना मी खूप काम केलंय. मी ज्या जागी आहे, तिथे खुश आहे. माझ्यासाठी तर पक्षाला पुन्हा निवडून आणणं याला प्राधान्य आहे. नेता कोण कधी बनेल यावर पक्ष निर्णय घेईल. कोण मुख्यमंत्री असेल, हे भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना विचारायला हवं. भाजपामध्ये सगळे निर्णय संसदीय समिती घेते. या संदर्भात काही बोलण्याचाही अधिकार मला नाही आहे. असे फडणवीस म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?

Mahayuti : महायुतीमध्ये महामंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला; भाजपच्या वाट्याला 48% पदं येणार

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस