ताज्या बातम्या

Devendra Fadnavis On Kishor Kadam : किशोर कदम यांची घर वाचवण्यासाठी मदतीची हाक; फडणवीसांनी घेतली तातडीने दखल

मराठी अभिनेते किशोर कदमांनी आपल्या घराच्या सुरक्षिततेसाठी फेसबुकवर मदतीची हाक मागितल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.

Published by : Team Lokshahi

मराठी अभिनेते आणि कवी सौमित्र म्हणजेच किशोर कदम यांनी आपल्या अंधेरीतील घराच्या सुरक्षिततेसाठी फेसबुकवर मदतीचे आवाहन केल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले आहेत.

किशोर कदम यांनी फेसबुकवर पोस्ट करत चकाल्यातील ‘हवा महल’ सोसायटीच्या पुनर्विकास प्रक्रियेत गंभीर गैरव्यवहार व भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, या अनियमिततेमुळे त्यांच्या घरासह सोसायटीतील आणखी 23 सदस्यांचे घर धोक्यात आले आहे. कदम यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सहकारमंत्री यांनाही मदतीची विनंती केली होती.

फडणवीसांनी सोशल मीडियावरच त्यांच्या पोस्टची दखल घेत उत्तर दिले. त्यांनी लिहिले की, "किशोरजी, आपली ही तक्रार मी सहकार सचिव प्रवीण दराडे आणि एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांना कळवली आहे. त्यांनी त्वरित लक्ष घालून आपल्याशी संपर्क साधावा, अशा सूचना दिल्या आहेत."

कदम यांच्या मते, सोसायटीच्या कमिटीने सभासदांना अंधारात ठेवून महत्वाची कागदपत्रे लपवली असून, पुनर्विकासाशी संबंधित निर्णय पारदर्शकपणे घेतले गेले नाहीत. त्यामुळे या प्रक्रियेत तातडीने हस्तक्षेप करून सदस्यांचे हक्क अबाधित ठेवावेत, अशी त्यांची मागणी आहे. ही घटना पुन्हा एकदा दाखवून देते की सोशल मीडियाच्या माध्यमातून मांडलेल्या तक्रारींना प्रशासनाकडून त्वरित प्रतिसाद मिळू शकतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Tuljapur News : तुळजापुरात आव्हाडांच्या कारसमोर भाजप कार्यकर्त्याचा राडा!

Aadhaar Card : सर्वोच्च न्यायालयाच्या निरीक्षणानंतर आधारच्या भूमिकेवर नव्या चर्चेंना सुरुवात

Ajit Pawar : स्वातंत्र्यदिनी मांसविक्रीच्या बंदीवर अजित पवारांचा विरोध; नेमकं काय म्हणाले...

Priyanka Gandhi X Post : प्रियांका गांधींनी युद्धासंदर्भात केलेल्या ट्विटमुळे इस्रायलचा पारा चढला; काय आहे 'त्या' ट्विटमध्ये?