Admin
Admin
ताज्या बातम्या

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, 9 महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे...

Published by : Siddhi Naringrekar

आज महाराष्ट्र दिन. महाराष्ट्र दिन हा महाराष्ट्र राज्याचा निर्मिती दिवस म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण राज्यात आज महाराष्ट्र दिन साजरा केला जात आहे. महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपुर येथे ध्वजारोहण करण्यात आलं.

यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाच्य शुभेच्छा दिल्या. तसेच विविध योजनेंची माहिती देखिल दिली. देवेंद्र फडणवीस म्हणाले की, निसर्गाच्या लहरीपणा मुळं शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. अशा वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शेतकरी सन्मान योजनेचा फायदा शेतकऱ्यांना झाला.आता महाराष्ट्र सरकारने देखील शेतकऱ्यांना सहा हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला. असे फडणवीस म्हणाले.

यासोबतच ते म्हणाले की, राज्यात आरोग्य विभागाच्या माध्यमातून तब्बल ३१७ ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात येणार आहेत. त्याच्या आज उद्घाटन करण्यात येत आहे. एसटी बसच्या तिकीटामध्ये महिलांना ५० टक्के सवलत देण्यात आलीय. नागपूरात देखील 14 दवाखाने सुरू करण्यात येणार आहे. 9 महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार आले आणि राज्याने विविध क्षेत्रात प्रगती केली.

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात गेल्यावर कसा अनुभव येतो? लोकशाहीशी बोलताना आदित्य ठाकरेंनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...

"देशभक्त शब्दावर आक्षेप घेणारे फडणवीस देशद्रोही आहेत"; उद्धव ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांवर पलटवार

Shivsena UBT : ठाकरे गट -भाजप कार्यकर्ते भिडले, कोटे समर्थकांनी पैसे वाटल्याचा ठाकरे गटाचा आरोप

"मोदींनी काँग्रेसचा कलंक संपवून अयोध्येत राम मंदिर उभारलं"; उत्तर प्रदेशचे CM योगी आदित्यनाथ यांचा विरोधकांवर हल्लाबोल

Manoj Jarange Patil : 4 तारखेला उपोषण करणार म्हणजे करणार