आज विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही महत्त्वाचे मुद्दे बाहेर काढले आणि त्यांच्यावर भाष्य केलं. आमदार शिवाजीराव गर्जेंनी MPSCच्या कारभारावरून प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर फडणवीसांनी आज सभेत उत्तर देत MPSC स्पर्धा परिक्षेबाबद महत्त्वाची घोषणा केली आहे. MPSCच्या परीक्षेचे टाईमटेबल, निकाल यामध्ये होणाऱ्या टंगळमंगळमुळे विद्यार्थ्यांचा असंतोष पाहायला मिळत आहे. त्यामुळे MPSCच्या कारभारावर टीका सुरू आहे.
यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले की, युपीएससीची कधी परीक्षा होणार, कधी मुख्य परीक्षा आणि मुलाखत होणार असून आता एमपीएससीमध्ये देखील कॅलेंडर करण्यात यावे असा प्रयत्न सुरु आहे. एमपीएससी महामंडळात ज्या रिकाम्या जागा आहेत त्यापैकी एक जागा पूर्ण करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून उर्वरीत दोन जागांसंदर्भात आपण ॲड देतो आहोत. एमपीएससी परीक्षा या वर्षापासून आपण डिस्क्रीप्टिव्ह स्वरुपात घेणार आहोत.
परिक्षेचा निकाल आला तेव्हापासून आपण वेगाने काम केलं, तरी देखील मी मान्य करतो की अजून वेगाने काम करू तसेच एमपीएससीमार्फत भविष्यात मोठ्या प्रमाणात भरती प्रकिया करतो आहे. तर वेगवेगळ्या न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे कधी कधी भरतीमध्ये अधिक वेळ लागतो. असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
एमपीएससीच्या परीक्षा खासगी संस्थांकडून न घेता आयोगाकडूनच घेण्यात याव्यात या मागणीवर फडणवीस म्हणाले की, एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते परीक्षा घेण्यापर्यंतचे सर्व कामकाज एमपीएससीकडून होते. त्यामुळे एमपीएससीने गेल्या काही वर्षात पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्याचा उपक्रम चालवला असून त्यात कोणताही गोंधळ झालेला नाही.