ताज्या बातम्या

बिना बुद्धीचं बोललं जात असेल तर त्यावर आपण काय बोलणार; शिवानी वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावकरांबाबत केलेल्या विधानावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते.

Published by : Siddhi Naringrekar

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावकरांबाबत केलेल्या विधानावरुन राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. याविरोधात भाजपाने आक्रमक होत सावरकर गौरव यात्राही काढली होती. तर, उध्दव ठाकरेंनी राहुल गांधींना इशारा दिला होता. हे वातावरण शांत होता न होताच पुन्हा एकदा काँग्रेसकडून सावरकरांचा अपमान करण्यात आला आहे. माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या कन्या शिवानी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याने वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

हे लोक फुले, शाहू, आंबेडकरांचा विचारांचा कधीच मोर्चा काढणार नाही. कुठला मोर्चा काढतात? सावरकर मोर्चा काढतात. सावरकर मोर्चा काढून काय करतात. सावरकर मला आणि माझ्यासोबत महिला, भगिनी उपस्थित आहेत. सर्वांना भीती वाटत असेल कारण की सावरकरांचे विचार होते. सावरकर म्हणायचे, की बलात्कार हे राजकीय हत्यार आहे. हा तुम्ही आपला राजकीय विरोधकाविरुध्द वापरलं पाहिजे. मग, माझ्या सारख्या इथे उपस्थित महिला-भगिनींना कसं सुरक्षित वाटेल. आणि अशा लोकांचा प्रचार करत हे लोक रॅली काढतात, असे शिवानी वडेट्टीवार यांनी एका कार्यक्रमात म्हटले आहे.

याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. फडणवीस म्हणाले की, हे लोक विचार न करता काहिही बोलतात. अशा लोकांच्या वक्तव्यावर काय प्रतिक्रिया द्यायचीकाही लोकांना इतिहास माहिती नाही. बिना बुद्धीचं बोललं जात असेल तर त्यावर आपण काय बोलणार. असे फडणवीस म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

Periods Delaying Pills : धक्कादायक! मासिक पाळी थांबवण्यासाठी गोळ्या खाणं जीवावर बेतलं; तरुणीचा मृत्यू

Ganesh Chaturthi 2025 : गणेशोत्सवावर सीसीटीव्हीची करडी नजर; 15 हजार पोलिसांचा बंदोबस्त

Latest Marathi News Update live : मुंबईच्या राज्याचे प्रथम दर्शन