छत्रपती संभाजीनगरमधील किराडपुरा भागात दंगल झाली होती. पोलिसांच्या गाड्या जाळण्यात आल्या होत्या. तसेच मुंबईतल्या मालवणी परिसरात राम नवमीच्या शोभायात्रेदरम्यान तीन गटांमध्ये राडा झाला.
तसेच आज (1 एप्रिल )खासदार संजय राऊत यांना लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. धमकी चा मॅसेज खासदार संजय राऊत यांच्या मोबाईलवर आला असल्याची माहिती मिळत आहे. हिंदू विरोधी असल्यामुळे मारून टाकू असा हा मॅसेज आहे. दिल्लीत आल्यावर AK 47 ने उडवून टाकू. मुसेवाला टाईपमध्ये मारु. लॅारेन्स के और से मॅसेज है, सलमान और तू फिक्स तयारी करके रखना. अश्लील शिवीगाळ करत हा मॅसेज करण्यात आलांय.
याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या की, राज्यातल्या दंगली आणि संजय राऊतांच्या धमकी प्रकरणात देवेंद्र फडणवीसांनी लक्ष घातलं पाहिजे.सरकारने संजय राऊतांना तातडीने झेड प्लस सुरक्षा दिलीच पाहिजे. देवेंद्र फडणवीसांना गृहमंत्रालयाची जबाबदारी झेपत नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस प्रतिउत्तर देत म्हणाले की, मी गृहमंत्री झाल्यामुळे अनेक लोकांची अडचण झाली आहे. लोकांना मनातून वाटतंय की मी गृहमंत्री राहू नये. मात्र त्यांना मी सांगतो, मी गृहमंत्री राहणार आहे. जे जे चुकीचं काम करतील त्यांना शासन करणार. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.