काही दिवसांपासून औरंगजेबाच्या कबरीचा वाद उफाळून आलेला पाहायला मिळत आहे. अशातच काल नागपुरमध्ये रात्री दोन गटांमध्ये दंगल झालेली पाहायला मिळाली आहे. यावरुन कालपासून अनेक राजकीय पडसाद पडताना दिसले. अशातच नितेश राणे यांनी नुकताच मल्हार सर्टिफिकेटमध्ये हलाल मटण आणि झटका मटण हे मुद्दे काढले होते आणि नागपूरमध्ये औरंगजेबच्या कबरीवरून पेटलेल्या वादावर देखील नितेश राणेंनी वादग्रस्त प्रतिक्रिया दिली आहे.
यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितेश राणे यांनी कार्यालयात बोलावून तंबी देत वादग्रस्त विधान टाळा असं खडसावलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर नितेश राणे यांनी विधानसभा अध्यक्षांची देखील भेट घेतली. विधानसभा अध्यक्षांच्या भेटीत नेमकं काय ठरलं काय चर्चा झाली याची माहिती अध्यात्प मिळाली नसली, तरी भाजपच्या शीर्षनेतृत्वाने पुढील काही दिवस नितेश राणे यांना शांत राहण्याच्या सूचना केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या दालनात अनेक वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.