ताज्या बातम्या

गणपत गायकवाड गोळीबार प्रकरणाची चौकशी करण्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आदेश

गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट बीडमधून समोर येत आहे. ग्रहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोळीबार प्रकरणात वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश दिले आहेत.

Published by : shweta walge

गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट बीडमधून समोर येत आहे. ग्रहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गोळीबार प्रकरणात वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश दिले आहेत. डीजींना तसे आदेश देखील दिले आहेत. अशी माहिती गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलीय. ते बीडच्या गहनीनाथ गडावर मिडीयाशी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले, कायद्यासमोर सगळे समान आहेत. कोण कुठल्या पक्षाचा आहे हे विचार न करता कायदेशीरच कारवाई केली जाईल. गोळीबाराची ही घटना पोलीस स्टेशनमध्ये का घडली? गोळीबार झाला याच सत्य आपल्याला काढावा लागेल. यासंदर्भात वरिष्ठ स्तरावर चौकशीचे आदेश डीजीना दिले आहेत. या संदर्भात अत्यंत कड्क कारवाई करण्यात येईल. असं यावेळी फडणवीस म्हणाले.

त्याचबरोबर लालकृष्ण अडवाणींना भारतरत्न मिळाला हे मला तुमच्याकडूनच माहिती मिळाला आहे. जर जाहीर झाला असेल तर ते खऱ्या अर्थाने लालकृष्ण अडवाणी हे या देशाचे लोहपुरुष आहेत . ज्याप्रमाणे आडवाणीनी या देशाची सेवा केली, एक गृहमंत्री म्हणून त्याचे खूप मोठे योगदान आहे. सातत्याने देशाच्या विचार मनामध्ये असणारे ते होते.. 70 वर्ष या देशातच्या राजकारणात होते, मात्र एकही कलंक त्यांच्यावर नाही.

आपण त्यांचे विचार ऐकले संघर्ष पाहिला तर मला वाटतं लाल कृष्ण आडवाणी हे एक लिंगवलेजेंट म्हणतात.. त्यामुळे मला त्यांना भारतरत्न मिळाल्याबद्दल अतिशय आनंद आहे. असं देखील यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, भाजपा आमदार गणपत गायकवाड यांनी उल्हासनगरच्या हिललाईन पोलिस ठाण्यातच शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर काल रात्री गोळीबार केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा परिणाम राज्यातील महायुती सरकारवरही झाला आहे. या गोळीबारात महेश गायकवाड आणि राहुल पाटील असे दोघे जखमी झाले आहेत. यावरुन राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरुन विरोधी पक्षांनी टीका सुरु केली आहे. 

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा