Devendra Fadnavis Team Lokshahi
ताज्या बातम्या

"बाबरी पाडण्याचं सोडा, भोंगे काढायला सांगितलं तरी यांची..."; फडणवीसांची जीभ घसरली

देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर पातळी सोडून टीका केली आहे.

Published by : Team Lokshahi

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची मुंबईत सभा बुस्टर डोस सभा (Booster Dose Sabha) होत आहे. या सभेत देवेंद्र फडणवीस भाजप कार्यकर्त्यांना बुस्टर देणार आहे. तसेच या सभेतून आघाडी सरकारवर जोरदार हल्लाबोल करण्यात येणार आहे. त्याशिवाय या सभेतून भाजप महापालिका निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे.

बाबरी पाडण्याचं सोडा, यांची भोंगे काढायला सांगितल्यावर सुद्धा ...

बाबरी मशीद पडली, तेव्हा तुम्ही कुठे होतात असा सवाल केला जातो. मात्र मी त्यांना सांगतो की, बाबरी मशीद पाडायला आम्ही होतोच. एकही शिवसेनेचा नेता तिकडे नव्हता. बाबरी मशिदीचं सोडा पण भोंगे काढायला लावले तरी तुम्ही घाबरतात असं सांगताना फडणवीसांची जीभ घसरली.

तुम्ही म्हणजे हिंदू नाहीत...

देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले की, अलीकडे काही लोकांना वाटायला लागलंय की, ते म्हणजे महाराष्ट्र आहेत. मात्र महाराष्ट्र हा १८ पगड जातींचा, १२ कोटी लोकांचा, छत्रपती शिवरायांचा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसंच तुम्ही हिंदू नाही हे म्हणण्याची देखील आता वेळ आली आहे, मात्र मी तसं म्हणणार नाही, कारण मला हिंदुंची संख्या कमी करायची नाही असा टोला फडणवीसांना लगावला. त्यानंतर त्यांनी हे देखील सांगितलं की तुम्ही म्हणजे हिंदू नाहीत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा